Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली

सध्या धरणसाखळीत १६. ८० टीएमसी पाणी आहे. जुलै अखेरीस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास आठवडाभर कुठलिही पाणी कपात करू नये असा अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 08:31 PM
Pune Water Supply: चिंता मिटली! पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ दिवसापर्यंत पाणीकपात टळली
Follow Us
Follow Us:
  • पुण्यातील उद्यापासून पाणीकपात तूर्तास मागे
  • धरणसाखळीत ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असल्याची माहिती 
  •  पालखी सोहळ्यासाठी रद्द करण्यात आली होती पाणी कपात 
PMC/Khadakwasla Water Supply: पाउस थांबल्याने आणि नजीकच्या काळात पावसाचे प्रमाण कमी राहाणार असल्याने महापालिका आयुक्तांनी १५ जुलै पासून जाहीर केलेली पाणी कपात पुढे ढकलण्यात आली आहे.  पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरणसाखळीत ६० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असल्याने आणखी एक आठवडा पावसाचा अंदाज  घेउन पाणी कपातीबाबत निर्णय घेउयात. तूर्तास २२ जुलैपर्यंत कुठलिही पाणी कपात न करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.

जून महिन्यांत पावसाने ओढ दिल्याने शहरात जूनच्या तिसर्‍या आठवड्यापासून पाणी कपात करण्यात आली होती. शहरातील बहुतांश भागात एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतू जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाउस झाल्याने  धरणांच्या साठयात भरीव वाढ झाली. परंतू आठ तारखेनंतर पाउस थांबला.

पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा

हवामान खात्यानेही दोन आठवडे पाउस पडणार नसल्याचा अंदाज दिल्याने पुन्हा अनिश्‍चित परिस्थिती निर्माण झाली. अशातच ६ जुलैला झालेल्या पावसाने इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीतून सुरू होणार्‍या आषाढी पालखी यात्रा संकटात सापडली. वारकर्‍यांनी पुण्यातूनच पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. महापालिकेने पालखी सोहळ्यासाठी ९ आणि १० जुलैची पाणी कपात रद्द केली होती. परंतू मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ७ ते १२ जुलैपर्यंत पाणी कपात रद्द केली.

पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर सोमवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १५ जुलैपासून पुन्हा पाणी कपात सुरू करण्याचे जाहीर केले. परंतू खडकवासला धरण भरल्यानंतर मुठा कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी कपात करू नये. सध्या धरणसाखळीत १६. ८० टीएमसी पाणी आहे. जुलै अखेरीस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास आठवडाभर कुठलिही पाणी कपात करू नये असा अधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.

पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज

२२ जुलैला पुन्हा एकदा हवामान विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांसोबत चर्चा करून कपाती बाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर या उपस्थित होत्या.

Web Title: Pmc and manjusha nagpure stay pune water cut decision relfie to people

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Pune Corporation
  • pune news
  • Pune water supply

संबंधित बातम्या

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
1

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
2

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
3

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली
4

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! मुख्य विसर्जन मिरवणुकीत दीडशे मंडळांना परवानगी नाकारली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.