Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विठ्ठल भक्तांसाठी MSRTC सज्ज! पुणे विभागातून २१ जुलैपासून सुटणार तब्बल ‘इतक्या’ स्पेशल बसेस

Pune MSRTC: राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी एकूण ५,५०० विशेष एसटी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2026 | 02:35 AM
विठ्ठल भक्तांसाठी MSRTC सज्ज! पुणे विभागातून २१ जुलैपासून सुटणार तब्बल ‘इतक्या’ स्पेशल बसेस
Follow Us
Follow Us:
  • आषाढी यात्रेसाठी ४३० विशेष एसटी बसेस
  • पुणे विभागातून २१ ते २६ जुलैदरम्यान सेवा
  • जिजाऊ व नवीन परिवर्तन बसांचा समावेश
Pune Msrtc/Ashadhi Wari 2026: आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने विशेष वाहतूक नियोजन केले आहे.पुणे विभागातून ३३० विशेष बस सोडण्यात येणार असून,त्यासोबत अमरावती व नागपूर विभागातून आणखी १०० अतिरिक्त बस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.त्यामुळे पुणे विभागातून एकूण ४३० विशेष एसटी बस भाविकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

या विशेष बस सेवा २१ ते २६ जुलैदरम्यान चालविण्यात येणार आहेत.मुख्य स्वारगेट बसस्थानकासह पुणे विभागातील विविध तालुका मुख्यालयांवरून या बस सोडण्यात येतील.विशेष म्हणजे,२३ आणि २४ जुलै रोजी पंढरपूरकडे जाणाऱ्या बस २४ तास उपलब्ध असणार असल्याने भाविकांना कोणत्याही वेळी प्रवास करता येणार आहे.

या विशेष सेवेसाठी जिजाऊ आणि नवीन परिवर्तन प्रकारातील आरामदायी बसांचा वापर करण्यात येणार आहे.तसेच एसटी महामंडळाच्या सर्व वैध प्रवासी सवलती या विशेष बस सेवेलाही लागू राहणार असल्याने ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी तसेच विविध सवलतींचे पात्र लाभार्थी यांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

Ashadhi Wari 2026 : विठ्ठल दर्शनाची ओढ ठरली अखेरची वाट; जेजुरीजवळ अपघातात मिरज तालुक्यातील तीन माऊलींचा मृत्यू

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुख्य स्वारगेट बसस्थानकासह प्रमुख ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.प्रवाशांना तिकीट, मार्गदर्शन,बसची माहिती आणि अन्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.त्यामुळे भाविकांचा प्रवास सुरक्षित,सुरळीत आणि त्रासमुक्त होईल, असा विश्वास एसटी प्रशासनाने व्यक्त केला आहे.

राज्यभरातून ५,५०० बसेस सोडण्यात येणार आहेत.

राज्यभरातून आषाढी यात्रेसाठी एकूण ५,५०० विशेष एसटी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यात्रेच्या काळात भाविकांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने व्यापक नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे विभागाचे विशेष नियोजन

– पुणे विभागातून विशेष बस : ३३०

– अमरावती व नागपूर विभागातून अतिरिक्त बस : १००

– एकूण विशेष बस : ४३०

– बस सुटण्याची ठिकाणे : मुख्य स्वारगेट बसस्थानक व तालुका मुख्यालये

– जिजाऊ व नवीन परिवर्तन बसांची सेवा

– २३ व २४ जुलै रोजी २४ तास बस सेवा

– राज्यभरातून एकूण ५,५०० विशेष बस

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीतील रिंगण, फुगडी, दिंडी आणि टाळ-मृदुंग परंपरांचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मुख्य स्वारगेट बसस्थानक आणि तालुका मुख्यालयांवरून एकूण ४३० विशेष बस सोडण्यात येणार आहेत.सर्व भाविकांनी या विशेष बस सेवेचा लाभ घेऊन सुरक्षित व सुखकर प्रवास करावा.

– कमलेश धनराळे,

विभागीय वाहतूक अधिकारी,पुणे

Web Title: Pune msrtc division run 430 extra buses to ashadhi wari pandharpur 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Ashadhi Wari 2026
  • msrtc
  • pune news
  • st bus

संबंधित बातम्या

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
1

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर
2

खडकवासला धरणातील दूषित पाण्यावरुन अमोल बालवडकर आक्रमक; महापौर, आयुक्तांना दिला वॉटर प्युरिफायर

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?
4

पुण्यनगरीला प्रदूषणाचा विळखा! कोट्यवधी खर्च करून देखील समस्या कायम; शुद्ध हवा मिळणार कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.