Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पीएमपीची फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई; 4 महिन्यांत तब्बल…

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ने जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २८ लाख ५८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 08, 2026 | 01:56 PM
पीएमपीची फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई; 4 महिन्यांत तब्बल…

पीएमपीची फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाई; 4 महिन्यांत तब्बल…

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ने जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यात फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २८ लाख ५८ हजार रुपये दंड वसूल केला आहे. पीएमपी प्रशासनाने फुकट्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी ३११ चेकरची नेमणूक केली असून, या चेकरचे काही विशेष तपासणी पथक निर्माण करण्यात आली आहेत. हे पथक अचानकपणे कोणत्याही स्थानकांवर जाऊन प्रवाशांचे तिकीट तपासणी करुन फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत आहेत.

 

चेकर तिकीट तपासणी दरम्यान प्रवाशांकडे तिकीट नसेल तर ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी ‘आपले पीएमपीएमएल ॲप’,‘स्कॅन’ आणि ‘वाहकांकडून’ रोख रक्कम देऊन तिकीट काढण्याची सोय केलेली असताना देखील काही प्रवासी हे ॲपच्या माध्यमातून तिकीट काढतो असे म्हणून काढत नाहीत. अचानकपणे चेकरने तिकीट चेक केल्यानंतर काही प्रवाशांकडे तिकीट नसल्याचे आढळून येत आहे. अशा वेळी चेकरकडून फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

महिना दंड
जानेवारी -२०२६ ७,८२,५००
फेब्रुवारी –२०२६ ७,४९,५००
मार्च –२०२६ ६,६४,५००
एप्रिल -२०२६ ६,६१,५००
सर्वसामान्य व्यक्तीला परवडेल असे पीएमपीच्या तिकीटाचे दर ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करु नये, पीएमपीला सहकार्य करावे. – महेश आव्हाड (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी)

हे सुद्धा वाचा : चिमुकलीचा खून, मुलाला जंगलात फेकले; ‘या’ कारणावरुन बापाने उचलले टोकाचे पाऊल

पुण्यात पीएमपीची बससेवा कोलमडली

पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) ही शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानली जाते. मात्र दररोज ५४ बसेस ब्रेकडाऊनमुळे बंद पडत आहेत. या बससेवेची अवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे चित्र समोर येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए परिसरात सेवा देणाऱ्या पीएमपीच्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. मागील २०२४,२०२५ आणि मार्च २०२६ पर्यत पीएमपीच्या तब्बल ४४ हजार ३०४ वेळा बस ब्रेकडाऊन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये भाडेतत्त्वावरील बस ३१ हजार ९०२ वेळा, तर पीएमपीच्या स्वतःच्या मालकीच्या बस १२ हजार ४०२ वेळा बंद पडल्या आहेत. याचा सरासरी विचार करता दररोज सुमारे ५४ बस बंद पडत असल्याचे स्पष्ट होते. या सततच्या बिघाडामुळे कामावर, शाळा, महाविद्यालय किंवा रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे.वेळेवर पोहोचणे कठीण झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Pmp administration has collected fines from those traveling by bus without tickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • PMPML Bus
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब
1

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
2

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार
3

पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात…
4

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.