पुणे विद्यापीठाचा प्राध्यापकांना कडक इशारा (फोटो- सोशल मिडिया)
मागील परीक्षांच्या दरम्यान विद्यापीठाकडून नियुक्ती करूनही अनेक प्राध्यापक विविध कारणांचा हवाला देत परीक्षाविषयक कामकाजास हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (३)(ब), (४) व (५) च्या तरतुदींनुसार विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन कामात कसूर करणे किंवा आदेशाचे पालन न करणे हे गैरवर्तन मानले जाईल. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत केली जाईल.
कुलगुरूंच्या आदेशानुसार संबंधित शिक्षक, कर्मचारी किंवा संस्थांवर शिस्तभंगाची कारवाई, दंडात्मक शास्ती अथवा मान्यता स्थगितीची कारवाई केली जाऊ शकते, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, परीक्षांचे कामकाज वेळेत व पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी विद्यापीठाने ज्या प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे, त्यांना महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व संचालकांनी तातडीने कामासाठी कार्यमुक्त करावे, असे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत.
विद्यापीठात कोट्यवधींचा खर्च करूनही ‘वाय-फाय’ बंद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थ्यांसाठीची वाय-फाय सुविधा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचा आरोप रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदकडून करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या डिजिटल सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना विद्यार्थ्यांना मूलभूत इंटरनेट सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष सुरज श्रीराम गायकवाड यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे.






