Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा ‘ढोल ताशां’च्या नवीन तालांची पर्वणी

गणपती विसर्जनाची मिरवणूक आणि ढोल - ताशे यांचे जुने नाते आहे. त्यामुळे आता पथकांची संख्याही वाढली आहे. शहर आणि उपनगर मिळून एकूण दोनशे पथक सक्रिय आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2025 | 02:35 AM
Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा 'ढोल ताशां'च्या नवीन तालांची पर्वणी

Pune Ganesh Festival: जगात भारी आमचे पुणे! विसर्जन मिरवणुकीत यंदा 'ढोल ताशां'च्या नवीन तालांची पर्वणी

Follow Us
Follow Us:

पुणे/ सुनयना सोनवणे:  गणपती विसर्जनाचा आत्मा असणारे ढोल ताशा पथक नेहमीच आपल्या ठेक्याने मिरवणूक गाजवत असतात. याही वर्षी ही पथके आपल्या सादरीकरणाने मिरवणूक गाजवण्यासाठी सज्ज झाली आहेत. पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक विषयांना घेऊन हे वादन असणार आहे. तसेच यंदा नवीन काय ऐकायला मिळणार याचीही उत्सुकता मिरवणुकीच्या आधीच सर्वांना लागली आहे.

एकीकडे डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आपण बघतो. तर दुसरीकडे ढोलाच्या ठेक्यावर आणि ताशाच्या तर्रीवर मिरवणूक डोलावणारी तरुणाई मोठ्या प्रमाणात दरवर्षी सहभागी होताना दिसते. दिवसेंदिवस तरुणाईचा ढोल पथकात सहभागी होण्याकडे कल वाढला आहे. महिलांचाही उत्साही सहभाग पथकात पाहायला मिळतो.

गणपती विसर्जनाची मिरवणूक आणि ढोल – ताशे यांचे जुने नाते आहे. त्यामुळे आता पथकांची संख्याही वाढली आहे. शहर आणि उपनगर मिळून एकूण दोनशे पथक सक्रिय आहेत. ही पथके पारंपारिक तालासोबतच दरवर्षी नवीन वेगळा ताल बसवून गर्दी खेचून आणण्यात यशस्वी झाली आहेत. मिरवणुकी नंतरही त्यांचे वादन गाजले आहे. पारंपारिक ढोल, ताशे, संबळ, दिमटी, शंख, ध्वज असे अनेक वाद्य साहित्यांसोबत नवनवीन प्रयोग पथके करत असतात. त्यामुळे यावर्षी नवीन काय ऐकायला मिळेल याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.

नेहमीच्या तालाबरोबरच नवीन ताल आम्ही बसवले आहेत. रामजी की सवारी, बांगडा असे नवीन ताल आम्ही यावर्षी मिरवणुकीत वाजवणार आहोत. त्याचबरोबर पारंपारिक ढोलाऐवजी पर राज्यातले ढोल आम्ही प्रथमच वापरत आहोत. यावर्षीचा पोशाखही आकर्षक असणार आहे, अशी माहिती समर्थ ढोलपथकाचे संजय सातपुते यांनी दिली.

अगदी कमी वेळात आपला नावलौकिक वाढवलेले अभेद्य पथकही नेहमीच सक्रिय असते. पारंपरिक एक ते सहा या तालासोबतच ‘हे गणराया, ढोलीबाजा, महाकाल, भजनी ठेका, नवीन आणि जुना गावठी या तालांमधील नवीन व्हेरिएशन या वर्षी ऐकायला मिळेल. बाबू गेनू मंडळासाठी विसर्जन मिरवणूक वाजवणार असल्यामुळे त्या मंडळाच्या यावर्षीच्या देखाव्याला साजेसा असा ‘केरळी ठेका’ आम्ही बसवला आहे. पथकात मुलींचा सहभाग जास्त असल्यामुळे मुलींचा पोशाख, त्यांची केशरचना, नथ, बुगडी असा आकर्षक पेहराव असणार आहे, अशी माहिती अभेद्य पथकाचे सौरभ गुजर यांनी दिली.

ढोल, ताशा, ध्वज सोबतच संबळ मधील तालांचे नवीन प्रकार आम्ही या वर्षी सादर करणार आहोत, अशी माहिती कलावंत पथकाचे ताशावादक सौरभ गोखले यांनी दिली.

दोनशे ते अडीचशे वर्षांपासून पुरोगामी महाराष्ट्राला आणि गावभागाला लाभलेल्या परंपरा, यात्रा, जत्रा, आदींची अनेक प्रात्यक्षिके आम्ही यावर्षी ढोल ताशा वादनासोबतच करणार आहोत. ध्वज, झांज, ढोल, ताशे यांच्या वादनासह पथकाची आकर्षक वेशभूषा असणार आहे, असे नूतन मराठी विद्यालय पथकाचे यज्ञेश मुंडलिक यांनी सांगितले.

यावर्षी नवीन काय ऐकायला मिळणार?

कच्ची बाजा,
जोगण,
देवीचा ठेका,
कावड,
धमार,
रावडी राठोड,
भजनी ठेका,
इंद्रजीमी जम्बपर ,
तिहाई,
लावणी

Web Title: Pune ganpati visarjan mirvanuk dhol tasha pathak festival marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Ganesh Festival
  • pune ganpati
  • pune news

संबंधित बातम्या

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित
1

केतन अग्रवालच्या मृत्यूची खिल्ली उडवणे पडलं महागात; महिला डॉक्टरला पाच वर्षांसाठी केले निलंबित

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे
2

पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी; पंकजा मुंडे

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’
3

प्रार्थनेला आले यश! पुण्याच्या जलवाहिन्यांमध्ये अडकलेला रानगवा; झाली यशस्वी ‘घरवापसी’

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार
4

PMRDAचा मोठा निर्णय: ६०० गावांच्या सुनियोजित विकासासाठी पुढील २५ वर्षांचा नवा स्ट्रक्चरल प्लान तयार होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.