Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नळ कनेक्शनसाठी 50 हजारांची मागणी? महापालिकेच्या प्लंबरकडून सर्वसामान्यांची लूट; नागरिकांचा तीव्र संताप

दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे महापालिकेकडून अधिकृतरित्या मिळणाऱ्या नळ जोडणीत प्लंबरच मलिदा खाऊ लागले असून, एका नळजोडणीला नागरिकांकडून अतिरीक्त ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 11, 2026 | 12:40 PM
नळ कनेक्शनसाठी 50 हजारांची मागणी? महापालिकेच्या प्लंबरकडून सर्वसामान्यांची लूट; नागरिकांचा तीव्र संताप

नळ कनेक्शनसाठी 50 हजारांची मागणी? महापालिकेच्या प्लंबरकडून सर्वसामान्यांची लूट; नागरिकांचा तीव्र संताप

Follow Us
Follow Us:

पुणे : दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे महापालिकेकडून अधिकृतरित्या मिळणाऱ्या नळ जोडणीत प्लंबरच मलिदा खाऊ लागले असून, एका नळजोडणीला नागरिकांकडून अतिरीक्त ५० हजार रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याघटनेने मात्र, नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हे प्लंबर महापालिकेचे अधिकृत ठेकेदार आहेत. या घटनेनंतर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 

महम्मदवाडी परिसर पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर अनेक गृहनिर्माण संस्था व रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून नियमित पाणीपुरवठा मिळालेला नाही. विशेष म्हणजे, पाणीपुरवठा न मिळूनही नागरिकांकडून पाणीकर वसूल केल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. “आधी अनेक वर्षे पाणी मिळाले नाही, तरी कर भरावा लागला. आता पाणी येत असताना जोडणीला आगाऊ रक्कम मागितली जात असेल, तर या सुविधेचा उपयोग काय?” असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पाणी जोडणीसारख्या मूलभूत नागरी सुविधेसाठी नागरिकांना अवाजवी शुल्क आकारले जाणे चुकीचे आहे. कोणताही परवानाधारक प्लंबर किंवा कंत्राटदार नागरिकांकडून अनुचित रक्कम वसूल करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई व्हावी, हा मुद्दा पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला जाईल. – निवृत्ती बांदल नगरसेवक (महम्मदवाडी, प्र.क्र. ४१)

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नवीन नळ जोडणीसाठी महापालिकेने घालून दिलेल्या प्रक्रियेत अनेक जाचक अटी आहेत. गृहनिर्माण संस्थांकडून विविध दाखले, परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता करण्याची सक्ती केली जात आहे. या प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही परवानाधारक प्लंबर व कंत्राटदार प्रत्येक नळ जोडणीसाठी सुमारे ५० हजार रुपये आकारत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरून आता नगरसेवक- महापालिका अधिकारी यांच्यात संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

पुणे शहरात सुमारे ५७५ अधिकृत प्लंबर कार्यरत आहेत. नवीन नळ जोडणी ही अधिकृत प्लंबरमार्फतच घ्यावी लागते. मुख्य जलवाहिनीपासून नळ मीटरपर्यंत पाणी पोहोचविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. प्लंबर अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल. – नंदकुमार जगताप (पाणीपुरवठा विभाग प्रमुख, पुणे महापालिका.)

हे सुद्धा वाचा : ग्रामीण भागात एमडी तयार करण्याचा कट उधळला! वाघोली पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल…

नवीन नळ कनेक्शन शुल्क (२०२५-२६)

घरगुती व्यावसायिक
अर्धा इंची १४७५ ३१०४
पाऊण इंची २९४६ ६०४९
एक इंची ७७५७ १४२७२
दीड ते दोन इंची १९३९४ ६२०५३
अडीच ते तीन इंची २९४७७ ८०६६७
तीन इंच पुढे ३९८१० ११९४५२

Web Title: Pune municipal corporation plumbers are looting common citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Raksha Bandhan 2026: ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती! राखी बांधा आणि झाड लावा’, काय आहे विशेष उपक्रम?
1

Raksha Bandhan 2026: ‘इको-फ्रेंडली’ राख्यांना विशेष पसंती! राखी बांधा आणि झाड लावा’, काय आहे विशेष उपक्रम?

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच
2

DSP Trophy U-12 Cricket: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि फँटम क्रिकेट अकादमीची विजयी आगेकूच

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…
3

तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच, पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट…

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
4

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.