Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : बारामती-इंदापूरमध्ये मान्सूनचा जोरदार शिरकाव; काही भागांत तीन तासांहून अधिक मुसळधार पाऊस

बारामती शहर, औद्योगिक वसाहत परिसर आणि इंदापूर तालुक्यात रविवारी मान्सूनने दमदार हजेरी लावत मुसळधार पाऊस कोसळला. भवानीनगर, सणसर, काटेवाडी आणि परिसरात सलग तीन तासांहून अधिक काळ पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साचले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 07, 2026 | 09:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बारामती प्रतिनिधी : बारामती शहरासह औद्योगिक वसाहत परिसर आणि इंदापूर तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये रविवारी सायंकाळी मान्सूनने दमदार हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने परिसर जलमय झाला. विशेषतः भवानीनगर, सणसर, काटेवाडी आणि आसपासच्या भागांत सलग तीन तासांहून अधिक काळ पाऊस कोसळल्याने शेतशिवारांमध्ये पाणी साचले.

कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या सूचना

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. भवानीनगर, सणसर, काटेवाडी, पिंपळी आणि परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाचा जोर वाढत गेला. भवानीनगर परिसरात तब्बल तीन तासांपेक्षा अधिक काळ सुरू असलेल्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचून वाहू लागले. काही ठिकाणी लहान नाले आणि ओढ्यांनाही पाणी आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बारामती शहर आणि औद्योगिक वसाहत परिसरातही सुमारे पाऊण तास मुसळधार पाऊस झाला. अचानक कोसळलेल्या पावसामुळे काही रस्त्यांवर पाणी साचले असून वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र माळेगाव परिसरात तुलनेने कमी पाऊस झाला असून तेथे रिमझिम स्वरूपाचा पाऊस नोंदवण्यात आला.

या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः आंबा आणि इतर फळपिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांच्या स्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या दमदार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनच्या आगमनानंतर या भागात झालेला हा पहिलाच जोरदार पाऊस असल्याने शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

Laxman Hake: ‘…तर ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पहिला सदस्य होईन’, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा सांगलीतून सत्ताधाऱ्यांना थेट इशारा

दरम्यान, विजांच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत इंदापूर तालुक्यातील अनेक भागांत पावसाची संततधार सुरू होती. हवामानातील बदल आणि मान्सूनच्या सक्रियतेमुळे आगामी काही दिवसांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Pune news strong onset of monsoon in baramati indapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • pune news
  • pune news update

संबंधित बातम्या

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
1

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
2

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश
3

चाकणमधील वाहतूक कोंडी फुटणार? जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे संबंधित विभागांना महत्वाचे निर्देश

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?
4

Football प्रेमींसाठी पर्वणी! पुण्यनगरीत ‘लोयोला कप २०२६’चा धुमाकूळ; पाहा कोणते संघ आमनेसामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.