Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विषारी दारू प्रकरणात १८ जण दगावले ! रोहित पवार घटनास्थळी दाखल.. कार्यकर्त्यांनी फोडलं दारूचं दुकान !

या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अश्यातच आत मोठी बातमी येत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे त्या दारू दुकानाच्या स्थळी पोहोचले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होत दुकानाची तोडफोड केली आहे.

  • By विवेक
Updated On: May 29, 2026 | 02:31 PM
Pune poisonous liquor case Rohit Pawar and NCP Sharad Pawar party workers vandalized liquor shop, Rohit Pawar and NCP Sharad Pawar party workers vandalized liquor shop, Pune poisonous liquor case

Pune poisonous liquor case Rohit Pawar and NCP Sharad Pawar party workers vandalized liquor shop, Rohit Pawar and NCP Sharad Pawar party workers vandalized liquor shop, Pune poisonous liquor case

Follow Us
Follow Us:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्काफायक बातमी समोर आली असून, यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी दारूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असून या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अश्यातच आत मोठी बातमी येत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे त्या दारू दुकानाच्या स्थळी पोहोचले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी संतप्त होत दुकानाची तोडफोड केली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “जेव्हा सिस्टीम काम करत नाही. जेव्हा पोलीस प्रशासन कमी पडतं. म्हणून आम्हाला लोकांना एक संदेश द्यायचा आहे. काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील. लहान मुलींवर अत्याचार होतो, महिलांवर अत्याचार होतो तेव्हाही सिस्टीम मदत करत नाही,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले रोहित पवार?

या घटनेबाबत आपल्या ‘X’अकाऊंटवरून ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “पुण्यात हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत भीषण आणि गृह विभागाच्या बेलगाम आणि भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश करणारी आहे. पुण्यात ससून हॉस्पिटलला भेट देऊन या घटनेत मृत्यू झाल्याबाबतच्या कारणांचा काही अहवाल आहे का, याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेचं कारण सांगून हा अहवाल दाखवता येत नसल्याचं थातूरमातूर कारण अधिकाऱ्यांकडून देण्यात आलं.”

पुण्यात हडपसर आणि फुगेवाडी भागात विषारी दारू पिऊन तब्बल 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत भीषण आणि गृह विभागाच्या बेलगाम आणि भ्रष्टाचारी कारभाराचा पर्दाफाश करणारी आहे. पुण्यात ससून हॉस्पिटलला भेट देऊन या घटनेत मृत्यू झाल्याबाबतच्या कारणांचा काही अहवाल आहे का, याबाबत… — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 29, 2026

ते पुढे म्हणाले, “हे अत्यंत गंभीर प्रकरण असून अनेकजण अजूनही मृत्यूशी झुंजत आहेत. राज्यात बोकाळलेल्या अवैध धंद्यांविरोधात वारंवार आवाज उठवूनही सरकार त्याला आळा घालू शकलं नाही आणि यामुळंच अवैध दारू पिऊन १८ जणांचा बळी गेला, याची पूर्णतः जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. पाशवी बहुमतामुळं हे सरकार केवळ तांत्रिकदृष्ट्या सत्तेत आहे पण नैतिकदृष्ट्या या सरकारने कधीच जनतेचा विश्वास गमावलाय. त्यामुळं आपल्या जबाबदारीचं थोडं जरी भान या सरकारला असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी…”

नेमकं काय घडलं?

हडपसर येथील काळेपडळ येथे अत्यंत सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे हा या विषारी दारूचा अड्डा चालवत होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती. ही दारू त्याने हडपसर आणि फुगेवाडी येथील अवैध अड्ड्यांवर पुरवली. ही दारू प्यायल्यानंतर नागरिकांना तीव्र उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. काही तासांतच एकापाठोपाठ एक अशा १८जणांचा मृत्यू झाला.

पुणे-पिंपरी हादरले ! केमिकलयुक्त विषारी दारूमुळे 15 जणांचा संशयास्पद मृत्यू; प्रशासनासमोरच मृत्यूचे थैमान

योगेश वानखेडे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) रेकॉर्डवरील अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. या घटनेमुळे दारू बनवत असलेल्या ठिकाणचे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वानखेडे प्रशासनाच्या डोळ्यांदेखत एवढा मोठा विषारी दारूचा अड्डा चालवतोच कसा? केमिकल स्पिरिटचा बेकायदेशीर पुरवठा त्याच्यापर्यंत पोहोचतोच कसा? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

Pune LPG Cylinder Fraud : पुण्यात फसवणूकीचा नवा प्रकार? सिलेंडरमधून गॅस ऐवजी निघालं पाणी; VIRAL VIDEO ने धुमाकूळ

Web Title: Pune poisonous liquor case rohit pawar and ncp sharad pawar party workers vandalized liquor shop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 02:31 PM

Topics:  

  • pune news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
1

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
2

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू
3

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’
4

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.