
Payal Jhambre Suicide: पायल झांबरेच्या सासू-सासऱ्यांना कोर्टात आणताच प्रचंड गदारोळ; "खटला चालवा फास्ट ट्रॅकवर", नागरिकांचा संताप!
पुणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरात पायलच्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठा मोर्चा काढत परिसर ढवळून काढला. “हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी,” अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. तसेच कोणत्याही वकिलांनी या आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये, असा इशाराही आंदोलकांनी दिला. आंदोलनादरम्यान पायलची काकू आणि भावाने आरोपींवर कठोर कारवाईसाठी हंबरडा फोडला.
आंदोलनावेळी भावूक झालेल्या पायलच्या भावाने सांगितले, “आमच्या पायलदीदीला सासरच्यांकडून पहिल्यापासून खूप त्रास दिला जात होता. ती अत्यंत स्ट्राँग होती, तिने सर्व त्रास सहन केला, पण शेवटी सासरच्यांनी तिला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले.” तर, “कुणालाही सोडू नका, आरोपींना फाशी द्या! माझ्या मुलीचा खूप छळ केला आहे,” असा संताप पायलच्या काकूने व्यक्त केला. या आंदोलनात स्वारगेट आणि परिसरातील नागरिकांसह पायलचे नातेवाईक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Ans: सासरच्या मंडळींकडून सतत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायल झांबरे या विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली.
Ans: स्वारगेट पोलीस ठाण्यात पायलचा पती, सासू-सासरे आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सासू-सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Ans: नातेवाईक व नागरिकांनी कोर्टाबाहेर ठिय्या आंदोलन करत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.