Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात पावसाचा लंपडाव सुरुच; ढग येतात खरे पण पाऊस मात्र नाही, आता नुसतीच प्रतिक्षा…

मान्सून दाखल होण्यापूर्वी पडणारा पूर्वमोसमी पाऊस हा सर्वदूर आणि एकसमान स्वरूपाचा नसतो. हा पाऊस मुख्यतः स्थानिक पातळीवरील तापमानातील वाढ आणि हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 10, 2026 | 01:41 PM
पुण्यात पावसाचा लंपडाव सुरुच; ढग येतात खरे पण पाऊस मात्र नाही, आता नुसतीच प्रतिक्षा...

पुण्यात पावसाचा लंपडाव सुरुच; ढग येतात खरे पण पाऊस मात्र नाही, आता नुसतीच प्रतिक्षा...

Follow Us
Follow Us:

पुणे : जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी पुणे शहरात अद्याप अपेक्षित पहिला जोरदार पाऊस पडलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून शहरात ढग दाटून येत असले, तरी अनेक भागांत प्रत्यक्षात पावसाचा एक थेंबही न पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही परिस्थिती पूर्णपणे नैसर्गिक असून मान्सूनपूर्व संक्रमण काळातील हवामान प्रक्रियेचा भाग असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) पुणे येथील वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप यांनी स्पष्ट केले.

डॉ. एस. डी. सानप यांच्या मते, मान्सून दाखल होण्यापूर्वी पडणारा पूर्वमोसमी पाऊस हा सर्वदूर आणि एकसमान स्वरूपाचा नसतो. हा पाऊस मुख्यतः स्थानिक पातळीवरील तापमानातील वाढ आणि हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे एका भागात जोरदार पाऊस तर दुसऱ्या भागात कोरडे वातावरण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.

बारामतीत पोलिसांचा मोठा प्रहार ! जिममधील तरुणांना विकले जाणारे ‘टर्मिन’ इंजेक्शन जप्त; ८३ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक

पूर्वमोसमी पावसाचे स्वरूप स्थानिक मर्यादित भागापुरते राहते. या काळात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतात. याउलट प्रत्यक्ष मान्सूनचा पाऊस समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेने युक्त सक्रिय वाऱ्यांमुळे व्यापक आणि सातत्यपूर्ण स्वरूपाचा असतो. त्यामुळे मान्सून सुरू झाल्यानंतर बहुतांश भागांत तुलनेने नियमित पावसाची नोंद होते.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी (ता.९) कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याने उष्णतेचा त्रास अधिक जाणवला.

पुण्यातील तापमानात वाढ होण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी (ता. १०) कमाल तापमानात आणखी दोन अंश सेल्सिअस वाढ होऊन ते ३७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज असून आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या उंबरठ्यावरही पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागू शकतो.

बारामतीत भोंदू मौलानावर विनयभंग आणि जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा! महिलांची फसवणूक करून आरोपी काश्मीरला फरार

Web Title: Rain not continues in pune clouds do gather but there is no rainfall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 01:41 PM

Topics:  

  • Climate Change
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी, पुढील 4-5 दिवसांत…
1

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी, पुढील 4-5 दिवसांत…

Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले मात्र…; पावसाचा लपंडाव, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण
2

Maharashtra Rain Alert: ढग दाटूनी आले मात्र…; पावसाचा लपंडाव, नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत; कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला
3

छ. संभाजीनगरमध्ये मान्सून लांबला; सरासरीच्या केवळ ३६ टक्के पाऊस, शेतकरी चिंतेत; कृषी विभागाचा पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला

Maharashtra Weather Update : वादळ वारा अन् विजा…! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Update : वादळ वारा अन् विजा…! महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.