Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranjangaon Ganpati Mandir Closed : रांजणगाव महागणपती मंदिर साडेतीन महिन्यांसाठी बंद; नेमकं कारण काय?

श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिर बुधवार (दि. १५ एप्रिल) ते ३१ जुलै या कालावधीत सुमारे साडेतीन महिने भाविकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 13, 2026 | 05:47 PM
रांजणगाव महागणपती मंदिर साडेतीन महिन्यांसाठी बंद; नेमकं कारण काय?

रांजणगाव महागणपती मंदिर साडेतीन महिन्यांसाठी बंद; नेमकं कारण काय?

Follow Us
Follow Us:

रांजणगाव गणपती : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील श्री महागणपती मंदिरात व्यापक जतन व दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होत असून, बुधवार (दि. १५ एप्रिल) ते ३१ जुलै या कालावधीत सुमारे साडेतीन महिने मंदिर भाविकांसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सात मंदिरांच्या विकास आराखड्याअंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत असून, या कालावधीत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची संरचना, सभामंडप तसेच परिसरातील पायाभूत सुविधांची दुरुस्ती व सुशोभीकरणाची कामे हाती घेतली जाणार आहेत. या संदर्भातील माहिती पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी सोमवारी (दि.१३) मंदिर सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, रांजणगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे तसेच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

 

नित्यपूजा, धार्मिक विधी नियमितपणे सुरू

विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती व जिल्हास्तरीय समितीच्या मान्यतेनंतर हे काम सुरू करण्यात आले आहे. या काळात मंदिरातील नित्यपूजा, धार्मिक विधी आणि परंपरागत सेवा नियमितपणे सुरू राहतील; मात्र भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून, मंदिराबाहेर एलईडी स्क्रीनद्वारे थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना डिजिटल माध्यमातून दर्शन घेता येणार आहे.

मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवणार

कामकाजाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून, संवेदनशील भागांमध्ये अनधिकृत प्रवेश पूर्णतः बंद राहणार आहे. मुख्य दुरुस्तीची कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यानंतर उर्वरित किरकोळ कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, या कालावधीत मंदिर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : अखेर चिमुकल्यांच्या मैदानावर फिरला बुलडोझर; विरोध डावलून आरोग्य केंद्राचे काम सुरु

Web Title: Ranjangaon mahaganapati temple to remain closed for three and a half months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • maharashtra
  • pune ganpati
  • Shikrapur News

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.