Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

Rohit Pawar Sinchan Bhavan Meeting: बारामती आणि पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आ. रोहित पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. जनाई-शिरसाई योजनेतील अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 15, 2026 | 08:29 PM
जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार 'ॲक्शन मोड'वर! (Photo Credit- X)

जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार 'ॲक्शन मोड'वर! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर!
  • सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
  • दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न सुटणार?
बारामती, प्रतिनिधी: पुरंदर आणि बारामती मतदारसंघासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बहुचर्चित जनाई-शिरसाई पाणी योजनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे पुढे सरसावले आहेत. त्यासाठी त्यांनी आज (दि १५)पुण्यात सिंचन भवन याठिकाणी जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी बारामती आणि पुरंदर या दोन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यांतील दुष्काळी भागासाठी जनाई-शिरसाई ही एक अत्यंत महत्त्वाची उपसा सिंचन योजना आहे. या योजनेला खडकवासला प्रकल्पातून पाणी मिळत असून अवर्षणप्रवण (दुष्काळी) भागाला सिंचनासाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. सिंचन भवनला जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक घेऊन या योजनेतील अडचणी मांडल्या आणि त्यावर सविस्तर चर्चाही केली. या बैठकीला जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता शेटे, देशमुख आणि इतर अधिकारी यांच्यासह बारामती आणि पुरंदर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारामती तालुक्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतील विविध अडचणींसंदर्भात पुण्यात जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता (ID) अलका अहिरराव मॅडम, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके साहेब, कार्यकारी अभियंता शेटे साहेब, देशमुख साहेब आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन ही… pic.twitter.com/ef4reYKtON — Rohit Pawar (@RRPSpeaks) May 15, 2026


खडकवासला कालव्याची वहन क्षमता अपुरी असल्याने १००० क्युसेक्सने पाणी सोडले तरी इंदापूरला केवळ १२५ क्युसेक्स पाणी उपलब्ध होते. सिंचनासाठी इंदापूर-बारामतीला २०-२५ दिवस, भिगवन शाखेला १७-१८ दिवस आणि दौंडमधील उर्वरित फाट्यांना १५ दिवस लागून एकूण कालावधी ५०-५४ दिवस होतो. त्यामुळे जनाई-शिरसाई योजनांसाठी आवश्यक २०० क्युसेक्स पाणी उपलब्ध होत नाही. खडकवासला कालव्याची वहन क्षमता वाढवून आणि पावसाळ्यात खडकवासला धरणातून सोडल्या जाणाऱ्या पुराच्या पाण्याचा वापर करून तलाव भरल्यास दुष्काळी भागाला मोठा फायदा होऊ शकतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंदिस्त पाणी योजना मंजूर केली असून त्यासाठी ४५० कोटी रुपये इतका भरीव निधीही मंजूर केला आहे. बंदिस्त पाइपलाइनला ठिबक सिंचनाची जोड मिळाली तर अधिक क्षेत्र ओलिताखाली येईल. सोलर प्रकल्प आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली ;मात्र काम अद्याप प्रलंबित आहे. या सर्व मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

Sunil Shelke News: रोहित पवारांनी ‘भविष्यवाणीचा’ धंदा सुरू केलाय का? सुनील शेळके यांचा जळजळीत सवाल

कालव्याची लांबी, वहन तूट आणि कमी क्षमता यामुळे जनाई-शिरसाईला फक्त १०-१२ दिवस पाणी मिळते. त्यामुळे हा कालावधीही वाढवण्याबाबत चर्चा झाली. याशिवाय जामनेर तालुक्यामध्ये राबविलेल्या योजनेप्रमाणे तेथील वाघुर धरणातून बंद पाईपलाईने उपसा सिंचन योजनेमधून आणलेल्या पाण्याकरिता १० एकर अथवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला स्वतंत्र शेततळे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सामुदायिक शेततळे शासनामार्फत देण्यात येते, याच धर्तीवर ही योजना आपल्याकडेही राबविली तर त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा मुद्दा यावेळी त्यांनी मांडला. ज्या कॅनॉलमध्ये शेतकऱ्यांचे भूसंपादन झाले आहे त्याचे पैसे त्वरित मिळावेत. योजनेचे लाईटबील कायमस्वरूपी शासनाने भरावे, यासह इतर विविध मुद्द्यांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

‘‘जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी अजितदादांनी पहिल्यापासूनच मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला असल्याने योजनेतील अनेक कामं निविदा प्रक्रियेत आहेत. विशेषतः बंद पाईपलाईनचं कामही लवकर सुरु होणार आहे. खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्यावतीने मांडण्यात आलेल्या प्रत्येक मुद्द्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. पुरंदर उपसा योजनेमध्येही अजितदादांनी ५५ कोटी रु. मंजूर केलेली इलेक्ट्रीक आणि इतर कामं पुढच्या तीन महिन्यात सुरु करण्याची मागणीही प्रशासनाने मान्य केली. या सकारात्मक सहकार्याबद्दल प्रशासनाचेही आभार. अपेक्षा आहे की, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ही सर्व कामं वेगाने सुरु होतील.’’

Rohit Pawar: “आधी तुमची उधळपट्टी थांबवा मग जनतेला सांगा!”; पंतप्रधान मोदींच्या ‘बचत’ मंत्रावर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल

Web Title: Rohit pawar meeting with irrigation officials on janai shirsai water scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 08:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Pune
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Ketan Agarwal murder case : श्रीवास्तवांनी धाडलेली नोटीस,साहिल गोयलला आलीच नाही,वकील दुशिंगांचा दावा
1

Ketan Agarwal murder case : श्रीवास्तवांनी धाडलेली नोटीस,साहिल गोयलला आलीच नाही,वकील दुशिंगांचा दावा

Pune Crime: निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक माहिती
2

Pune Crime: निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक माहिती

Ketan Agrawal: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाच्या भावाला 10 कोटींची कायदेशीर नोटीस
3

Ketan Agrawal: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सियाच्या भावाला 10 कोटींची कायदेशीर नोटीस

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ
4

Ketan Agrawal : लोहगड हत्या प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय; सिया आणि चेतनच्या पोलीस कोठडीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.