सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पत्नीच निघाली मास्टरमाईंड
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य सूत्रधार सापडत नव्हता. पण आज या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच पत्नीने दिल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे.
8 वर्षांची मुलगी किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडली अन्…, सकाळी गोणीत भरलेला मृतदेह आढळला
सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिली होती. सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला होता. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता सतीश वाघ यांची पत्नी या संपूर्ण हत्याकांडाची मास्टरमाईंड असल्याचं समोर आलं आहे. सतीश वाघ हे भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मोमा होते.
हडपसरमधील शेतकरी तसेच व्यावसायिक सतीश वाघ यांच्या अपहरण व खूनप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पत्नीनेच सतीश वाघ यांच्या खूनाची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. हडपसरमधील हॉटेल व्यावसायिक तसेच शेतकरी असलेले सतीश ताताब्या वाघ (वय ५९) यांची ९ डिसेंबर रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्यानंतर अपहरणकरून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता.
Chennai Crime : चेन्नई हादरली! चर्चमधून परतत असताना विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनीवर अत्याचार
पोलिसांनी खूनाचा उलघडा करत हा खून सुपारी देऊन केल्याचे समोर आणत पाच जणांना अटक केली होती. खूनात प्रथम वाघ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या अक्षय हरीश जावळकर याने ५ लाखांची सुपारी देऊन केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता तपासात सतीश वाघ यांच्या खूनाची सुपारी सतीश वाघ यांच्याच पत्नीने दिल्याचं समोर आलं आहे. गुन्हे शाखेने पत्नीला अटक केली असून तपास सुरू केला आहे. अनैतिक संबंधातून हा खून केल्याचं सांगितलं जात आहे.
सतीश वाघ हे भाजप नेते आणि विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा होते. शेतकरी असलेल्या सतीश वाघ यांची हडपसर परिसरातील मांजरी भागात शेती आहे. याशिवाय हॉटेल्स, लॉन्स आणि शेती असा त्यांचा व्यवसाय आहे. सतीश वाघ यांना दोन मुलं आहेत. दोन्ही मुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. मात्र कुणाशीही भांडण नसणाऱ्या सतीश वाघ यांचं अचानक अपहरण झालं होतं. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी पुणे शहरापासून ३५ किलोमीटर अंतर असलेल्या शिंदवणे घाटात त्यांचा मृतदेह सापडला होता. त्यांच्या शरीरावर तब्बल ७२ वार होते. या खुनानंतर पुण्यात एकच खळबळ माजली होती.