Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; ‘बोगस’ मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2026 | 11:50 AM
मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; 'बोगस' मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

मतदार यादीपूर्वीच कार्यक्रम जाहीर केल्याने एकच गोंधळ; 'बोगस' मतदारांच्या समावेशाचा होतोय आता आरोप

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यापूर्वीच निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचा गंभीर आरोप पुणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केला आहे. एवढेच नव्हे तर, मुदत संपलेल्या कटक मंडळाच्या (कॅन्टोन्मेंट बोर्ड) सदस्यांना आणि महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांना या मतदार यादीत बेकायदेशीरपणे ‘घुसविण्याचा’ प्रयत्न केला जात असल्याचा संशयही पक्षांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे.

जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि. १९) आयोजित केलेल्या बैठकीत हा वाद उफाळून आला. या बैठकीनंतर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी पत्रकारांशी बोलताना प्रशासकीय कारभारावर तीव्र आक्षेप घेतले. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या मतदार यादीबाबत अनेक कळीचे प्रश्न उपस्थित केले. मात्र, या महत्त्वपूर्ण बैठकीला स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हेच अनुपस्थित राहिले.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना त्यांच्या प्रश्नांची ठोस उत्तरे मिळू शकली नाहीत. या बैठकीला प्रशासनाच्या वतीने उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपस्थित होत्या.

राजकीय पक्षांनी उपस्थित केलेले मुख्य आक्षेप काय?

– घोषणा आधी, यादी नंतर का? : अंतिम मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध होण्यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम कसा जाहीर केला? कॅन्टोन्मेंट सदस्यांचा मतदार यादीत समावेश कसा? पुणे जिल्ह्यातील कटक मंडळे (कॅन्टोन्मेंट बोर्ड) रद्द झाली असून, त्यांच्या सर्व लोकप्रतिनिधींची मुदत कधीच संपली आहे. तरीही त्यांचा समावेश मतदार यादीत का केला जात आहे?

– स्वीकृत नगरसेवकांच्या मतदानाचे काय? : महापालिकांमधील स्वीकृत नगरसेवकांना मतदारयादीत समाविष्ट करून त्यांना मतदानाचा अधिकार दिला जाणार का?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागवणार मार्गदर्शन

बैठकीत उपस्थित झालेल्या या गंभीर प्रश्नांवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी प्रशासनाची भूमिका मांडली. स्वीकृत नगरसेवकांच्या मतदानाचा हक्क आणि मुदत संपलेल्या कटक मंडळाच्या सदस्यांबाबत उद्भवलेल्या तांत्रिक व कायदेशीर अडचणींबाबत राज्य तसेच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मतदारयादी सखोल पुनर्रिक्षण मोहिमेचा आढावा

दुसरीकडे, या बैठकीत प्रशासनाने मतदार याद्या विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रमाचा आढावा घेतला. पात्र मतदारांची नोंदणी वाढविणे, मयत किंवा दुबार नावे वगळणे, दुरुस्ती प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि मतदान केंद्रस्तरावर समन्वय ठेवण्याबाबत चर्चा करण्यात आली. मतदार यादी अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी यावेळी केले.

NCP Politics : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय; तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर आता रोहित पवार नाराज?

Web Title: Schedule announced even before voter list opposition is quite aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • MLC Election Counting
  • political news
  • pune news
  • Pune Politics
  • Voter List

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
1

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा
2

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
3

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
4

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.