NCP Politics: राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय?तटकरे-पटेलांच्या भेटीनंतर, रोहित पवारांच्या अनुपस्थितीची राजकीय चर्चा
राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होणार आहे. पण या बैठकीला रोहित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहेत. रोहित पवार सध्या पुण्यात असून ते बैठकीला जाणार नसल्याचे कळताच ते पक्षात नाराज आहेत का, असे सवार आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांच कौतुकही केलं होतं. त्यांना क्षमतावान नेतेही संबोधल. पण त्यांच्या क्षमतेचा कसा वापर करून घ्यायचा, हे पक्ष नेतृत्त्वाच्या हातात असल्याचेही त्यांनी नमुद केलं होतं. हीच गोष्ट रोहित पवार यांना खटकल्याचे आता बोलले जात आहे. रोहित पवार सातत्याने प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंना टार्गेट करत आहेत. त्यातच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि शरद पवारांनी त्यांचेच कौतुक केल्याने रोहित पवार नाराज असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार हे त्यांच्या अनपेक्षित राजकीय भूमिकांमुळे कायम चर्चेत असतात. सध्याही त्यांच्या काही हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, या भूमिकांमुळे स्वतः शरद पवार गटातील नेत्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार गटाकडून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका केली जात होती. अजित पवारांच्या बंडानंतर पक्षफुटीला जबाबदार ठरवताना या दोन नेत्यांनाच सर्वाधिक लक्ष्य करण्यात आल्याचे चित्र होते. त्यामुळे आता अचानक सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, आज शरद पवार गटाच्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या मुद्यावर चर्चा होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अजित पवारांच्या निधनानंतर काही नेत्यांकडून “अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या,” असे दावे करण्यात आले होते. त्या विधानानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले होते.
याच पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये पडद्यामागे चर्चा झाल्याच्या बातम्याही समोर आल्या. मात्र, अशा कोणत्याही बैठका झाल्या नसल्याचा दावा एका गटाकडून करण्यात आला, तर दुसऱ्या गटाकडून संवाद झाल्याचे संकेत देण्यात आले. त्यामुळे नेमकं पडद्यामागे काय सुरू आहे? आणि आगामी काळात राष्ट्रवादीच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळणार का? याबाबत उत्सुकता वाढली आहे






