Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर मध्यरात्री ‘दरोडा’; मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर आरोप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीवर लेखा विभागातील मुख्य अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 10, 2026 | 06:36 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर मध्यरात्री 'दरोडा'; मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीवर मध्यरात्री 'दरोडा'; मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर आरोप

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीवर लेखा विभागातील मुख्य अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात तरतूद नसतानाही सुमारे ५२ कोटी ५५ लाखांची बिले नियमबाह्यपणे रात्रीतून अदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले. या संपूर्ण महाघोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन असून, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

मार्च अखेरच्या धावपळीत २४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. नवीन आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक मंजूर असताना, जुन्या कामांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद शिल्लक नसताना सुमारे ७० हून अधिक कामांची बिले घाईघाईने काढण्यात आली. यामध्ये स्थापत्य, पाणीपुरवठा आणि बीआरटी विभागाच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. विशेष म्हणजे, संबंधित विभागाच्या प्रमुखांना अंधारात ठेवून ही प्रक्रिया पार पडली आहे.

बोगस उपसूचनांचा बनाव

सभापती बारणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण जैन यांनी प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून नगरसेवकांच्या सह्या आणल्या तरच बिले मिळतील, अशी अट ठेकेदारांना घातली होती. “तुमच्या प्रभागातील कामे आहेत” असे सांगून सुमारे २० नगरसेवकांकडून सह्या मिळवण्यात आल्या. मात्र, नगरसचिव विभागाने अशा कोणत्याही उपसूचना अधिकृत नसल्याचे स्पष्ट केल्याने या बिलांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा केवळ तांत्रिक घोळ नसून महापालिकेच्या तिजोरीवर टाकलेला थेट दरोडा आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता जैन बैठकीला गैरहजर राहिल्याने संशयाचे धुके अधिक गडद झाले आहे. जोपर्यंत जैन यांचे निलंबन होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. — अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती.

विरोधी पक्षाचा आक्रमक पवित्रा

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनीही या प्रकरणावर कडक टीका केली आहे. “लेखा विभागाच्या अटीमुळेच हा गैरप्रकार झाला असून, संबंधित ठेकेदारांची सर्व बिले तत्काळ स्थगित करावीत. आयुक्तांनी वेळीच कारवाई न केल्यास आम्ही कायदेशीर लढा उभारू,” असा इशारा त्यांनी दिला. सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.

आयुक्तांकडून चौकशी समितीची स्थापना

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली आहे. यामध्ये: अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, अतिरिक्त, आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओभासे यांचा समावेश आहे. ही समिती गेल्या तीन वर्षांतील मार्च अखेरच्या व्यवहारांची झाडाझडती घेणार असून, सात दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे. तोपर्यंत संबंधित सर्व ठेकेदारांची बिले थांबवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा : आंबेगाव तालुक्यात रस्त्यालगत धोकादायक विहिरी; संरक्षक कठडे, जाळी अन् कुंपणाअभावी अपघाताचा धोका

सत्तारूढ पक्षनेत्यांची सावध भूमिका

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली. “ठेकेदारांनी कामे केली असतील तर त्यांना मोबदला मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. बिले चुकीची नाहीत, मात्र ती देताना जर गैरमार्गाचा अवलंब झाला असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी,” असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Serious allegations have been made against praveen jain the chief officer of the accounts department of pimpri chinchwad municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

रास्त भाव दुकानाच्या नावाखाली धान्याचा काळाबाजार? करजखेड्यात बोगस सोसायटी ठरावांचा खेळ; कोट्यवधींच्या अपहाराचे गंभीर आरोप
1

रास्त भाव दुकानाच्या नावाखाली धान्याचा काळाबाजार? करजखेड्यात बोगस सोसायटी ठरावांचा खेळ; कोट्यवधींच्या अपहाराचे गंभीर आरोप

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
2

Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे
3

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

शाळांमध्ये तीन दिवस साजरे होतेय ध्वजवंदन! १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत रोज झेंडा फडकणार
4

शाळांमध्ये तीन दिवस साजरे होतेय ध्वजवंदन! १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत रोज झेंडा फडकणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.