Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Election 2026 : तरुण कार्यकर्त्यांचा बूथवर ताबा; PMC निवडणुकीमध्ये ७० वर्षांच्या रणरागिणींनी हाती घेतली सूत्रे

PMC Election 2026 : पुण्यामध्ये वयाच्या सत्तरीत असलेल्या या “तरुण रणरागिणी” सकाळपासून संध्याकाळपर्यंत बूथवर ठामपणे उभ्या राहून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडत होत्या.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2026 | 06:26 PM
Seventy year-old woman takes charge of polling booth in Pune PMC Election 2026

Seventy year-old woman takes charge of polling booth in Pune PMC Election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यतील मतदान बूथवर तरुणांचा सहभाग
  • उंद्रीमधील एका बूथवर जेष्ठ महिलेने सांभाळली जबाबदारी
  • लोकशाहीच्या बळकट पायाभरणीचे एक प्रेरणादायी चित्र
PMC Election 2026 : पुणे : आकाश ढुमेपाटील : 29 महापालिकांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु आहे. 165 नगरसेवकांनासाठी ही निवडणूक होणार होती परंतु दोन नगरसेवक बिनविरोध झाल्याने 163 नगरसेवकांच्या निवडीसाठीची प्रक्रिया पार पडत आहे. 35 लाख मतदार आपल्या प्रभागांचे नवे कारभारी निवडणार आहेत.  दरम्यान. पुणे महानगरपालिका (PMC Elections 2026) निवडणुकीत जिथे ईव्हीएम बिघाड, आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळाच्या बातम्या चर्चेत होत्या, तिथेच लोकशाहीच्या बळकट पायाभरणीचे एक प्रेरणादायी चित्रही पुणे शहरात पाहायला मिळाले. (Municipal Elections)

पुणे शहरातील जवळपास सर्वच मतदान केंद्रांवर तरुण कार्यकर्ते बूथवर सक्रिय दिसून आले. मतदारांना मार्गदर्शन करणे, रांगा शिस्तबद्ध ठेवणे, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना मदत करणे, अशी जबाबदारी या तरुणांनी अत्यंत उत्साहाने पार पाडली. या पार्श्वभूमीवर एक विशेष आणि लक्षवेधी बाब समोर आली.महंमदवाडीमधील  एका मतदान केंद्रावर तब्बल सत्तर वर्षांवरील ज्येष्ठ महिलांच्या चमूने संपूर्ण बूथची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. वयाच्या सत्तरीत असलेल्या या “तरुण रणरागिणी” सकाळपासून संध्याकाळपर्यंत बूथवर ठामपणे उभ्या राहून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडत होत्या. त्यांच्या उत्साहापुढे अनेक तरुण कार्यकर्तेही थक्क झाले.

हे देखील वाचा : मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप

या ज्येष्ठ महिलांनी केवळ प्रतीकात्मक उपस्थिती न ठेवता, प्रत्यक्ष कामकाजात पुढाकार घेतला. मतदारांना योग्य माहिती देणे, गोंधळ झाल्यास शांतपणे समजावून सांगणे, प्रशासनाशी समन्वय ठेवणे, अशा जबाबदाऱ्या त्यांनी आत्मविश्वासाने पार पाडल्या. “लोकशाही ही फक्त तरुणांची मक्तेदारी नाही, तर अनुभव आणि जबाबदारी यांचीही गरज असते,” हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पुणे महापालिका निवडणुकीत तरुण आणि ज्येष्ठ यांचा हा समन्वय महत्त्वाचा संदेश देणारा आहे. एकीकडे तरुणाईचा जोश आणि ऊर्जा, तर दुसरीकडे ज्येष्ठांचा अनुभव आणि संयम या दोहोंच्या एकत्रित सहभागामुळे मतदान केंद्रांवर सकारात्मक वातावरण निर्माण झाले. अनेक मतदारांनीही या कार्यकर्त्यांचे कौतुक करत “अशा लोकांमुळेच मतदानाचा अनुभव सुलभ आणि विश्वासार्ह होतो,” अशी प्रतिक्रिया दिली.

हे देखील वाचा : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?

राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोप, बोगस मतदानाचे दावे आणि ईव्हीएम वाद यांचा गदारोळ असताना, बूथवर दिसलेले हे चित्र लोकशाहीचा आशावादी चेहरा दाखवणारे ठरले. विशेषतः सत्तर वर्षांच्या रणरागिणींनी बूथ चालवण्याची जबाबदारी स्वीकारणे, हे महिलांच्या सक्रिय सहभागाचे आणि लोकशाहीवरील विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत अनेक वादळे उठली असली, तरी बूथवर काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी आणि ज्येष्ठ महिलांनी दाखवलेली ही ऊर्जा, शिस्त आणि समर्पण हीच लोकशाहीची खरी ताकद असल्याचे चित्र या निवडणुकीत ठळकपणे समोर आले आहे.

Web Title: Seventy year old woman takes charge of polling booth in pune pmc election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप
1

Kolhapur Election Exit Polls: कोल्हापुरात भाजपच बॉस? एक्झिट पोलने उडवली सर्वांची झोप

PUNE NEWS : पुण्यातील दोघा भावांचे ‘लाठी-काठी’ पारंपरिक खेळात यश! नोंदवला खास वर्ल्ड रेकॉर्ड 
2

PUNE NEWS : पुण्यातील दोघा भावांचे ‘लाठी-काठी’ पारंपरिक खेळात यश! नोंदवला खास वर्ल्ड रेकॉर्ड 

BMC Exit Polls 2026: फडणवीस-शिंदे की ठाकरे… मुंबईवर कोणाचे राज्य? अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल काय सांगतो?
3

BMC Exit Polls 2026: फडणवीस-शिंदे की ठाकरे… मुंबईवर कोणाचे राज्य? अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल काय सांगतो?

BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? ‘एक्झिट पोल्स’नी वाढवली उमेदवारांची धाकधूक
4

BMC सह २९ महापालिकांसाठी मतदान संपले! उद्या निकाल, कोणाचं पारडं जड? ‘एक्झिट पोल्स’नी वाढवली उमेदवारांची धाकधूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.