Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“सुसंस्कृत महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल,” पुणे विषारी दारू प्रकरणावरून सुप्रिया सुळे यांचं मोठं विधान!

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून मोठे विधान करत 'तरुण पिढीला नशेचा विळखा पडला असून सुसंस्कृत, पुरोगामी महाराष्ट्राची 'उडता महाराष्ट्र' कडे वाटचाल सुरु आहे काय?' असा सवाल उपस्थित केला आहे.

  • By विवेक
Updated On: May 29, 2026 | 08:23 PM
Supriya Sule

Supriya Sule

Follow Us
Follow Us:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केमिकलयुक्त विषारी गावठी दारू प्यायल्याने तब्बल १८ जणांचा मृत्यू झाल्याची धक्काफायक बातमी समोर आली असून, यामुळे संपूर्ण राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. हडपसर येथील काळेपडळ येथे तयार झालेल्या या ‘विषारी दारूमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले असून या घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अश्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून मोठे विधान करत ‘तरुण पिढीला नशेचा विळखा पडला असून सुसंस्कृत, पुरोगामी महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल सुरु आहे काय?’ असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, बेकायदा विषारी दारुचा एवढा मोठा व्यापार सुरु होता. याबाबत वेळीच कारवाई केली असती तर हे जीव वाचले असते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती, अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत भाष्य केले. त्या म्हणाल्या, “पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारु पिल्यामुळे मोठी जिवितहानी झाल्याची घटना अतिशय गंभीर आहे. शहरात पुणे पोलीसांच्या नाकाखाली बेकायदा विषारी दारुचा एवढा मोठा व्यापार सुरु होता. याबाबत वेळीच कारवाई केली असती तर हे जीव वाचले असते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती. केवळ दारुच नाही तर ड्रग्जसारखी इतरही नशेचे साहित्य पुणे आणि परिसरात राजरोसपणे उपलब्ध होत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे. तरुण पिढीला नशेचा विळखा पडला असून सुसंस्कृत, पुरोगामी महाराष्ट्राची ‘उडता महाराष्ट्र’ कडे वाटचाल सुरु आहे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारु पिल्यामुळे मोठी जिवितहानी झाल्याची घटना अतिशय गंभीर आहे. शहरात पुणे पोलीसांच्या नाकाखाली बेकायदा विषारी दारुचा एवढा मोठा व्यापार सुरु होता. याबाबत वेळीच कारवाई केली असती तर हे जीव वाचले असते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती. केवळ… — Supriya Sule (@supriya_sule) May 29, 2026

त्या पुढे म्हणाल्या, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जरी या प्रकरणी कुणाची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक आहे. शहर आणि महाराष्ट्राला पडलेला नशेचा आणि विषाचा हा विळखा सुटलाच पाहिजे, यासाठी गृहखात्याने अधिकाधिक सजगतेने, पारदर्शक पद्धतीने कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे,” असे त्या म्हणाल्या.

“प्रिय देवेंद्रजी, पुण्यातले विषारी दारुकांड हे गृह खात्याला लागलेले आणखी एक लांच्छन,” संजय राऊत यांचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला

कडक कारवाई करणार – फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, “माझे पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. विषारी दारू कुठे तयार झाली ते शोधून काढले आहे. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,” असे ते म्हणाले.

नेमकं काय घडलं?

हडपसर येथील काळेपडळ येथे अत्यंत सराईत गुन्हेगार योगेश वानखेडे हा या विषारी दारूचा अड्डा चालवत होता. त्याने केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून ही विषारी दारू तयार केली होती. ही दारू त्याने हडपसर आणि फुगेवाडी येथील अवैध अड्ड्यांवर पुरवली. ही दारू प्यायल्यानंतर नागरिकांना तीव्र उलट्या, पोटदुखी आणि डोळ्यांसमोर अंधारी येण्याचा त्रास सुरू झाला. काही तासांतच एकापाठोपाठ एक अशा १८जणांचा मृत्यू झाला.योगेश वानखेडे हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) रेकॉर्डवरील अत्यंत सराईत गुन्हेगार आहे. या घटनेमुळे दारू बनवत असलेल्या ठिकाणचे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार वानखेडे प्रशासनाच्या डोळ्यांदेखत एवढा मोठा विषारी दारूचा अड्डा चालवतोच कसा? केमिकल स्पिरिटचा बेकायदेशीर पुरवठा त्याच्यापर्यंत पोहोचतोच कसा? असे संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

पुणे विषारी दारू प्रकरणात १८ जण दगावले ! रोहित पवार घटनास्थळी दाखल.. कार्यकर्त्यांनी फोडलं दारूचं दुकान !

Web Title: Supriya sule tweet over pune poisonous liquor case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • pune news
  • supriya sule

संबंधित बातम्या

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी
1

Pune News : PMC JE भरतीविरोधात काँग्रेस आक्रमक; शेकडो विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, फेरपरीक्षेची मागणी

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी
2

पुण्याच्या भूमीत मुंबई-दिल्लीचा डंका! १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय Badminton स्पर्धेत देव व इशिताची बाजी

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू
3

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण
4

Nitesh Rane: सुळेंच्या टीकेला राणेंचं प्रत्युत्तर; २०१९च्या राजकारणाची करून दिली आठवण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.