Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर स्वच्छ; बारामती नगरपरिषदेची अभूतपूर्व कामगिरी

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेने यंदा स्वच्छता, नियोजन आणि व्यवस्थापनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 17, 2026 | 12:30 AM
पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर स्वच्छ; बारामती नगरपरिषदेची अभूतपूर्व कामगिरी

पालखी सोहळ्यानंतर अवघ्या एका तासात शहर स्वच्छ; बारामती नगरपरिषदेची अभूतपूर्व कामगिरी

Follow Us
Follow Us:

बारामती : जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने बारामती नगरपरिषदेने यंदा स्वच्छता, नियोजन आणि व्यवस्थापनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. पालखी सोहळ्यापूर्वी शहरातील प्रमुख रस्ते, दिंडी मुक्कामस्थळे, सार्वजनिक ठिकाणे आणि पालखी मार्गावरील संपूर्ण परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली होती. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला.

 

पालखी बारामती शहरात दाखल झाल्यानंतर तसेच शारदा प्रांगण येथे मुक्कामी आल्यानंतर नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष, आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ, नगरसेवक, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि अधिकारी वर्ग यांनी गांधी चौक ते गुणवडी चौक या परिसरात प्रत्यक्ष स्वच्छता कामात सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीमुळे सफाई कर्मचारी आणि अधिकारी यांना मोठे प्रोत्साहन मिळाले आणि संपूर्ण यंत्रणा अधिक जोमाने कामाला लागली.

“स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकास व लोकसेवेच्या परंपरेला साजेसा पालखी सोहळा यंदा पार पडला. सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेने अभूतपूर्व स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर ठेवले.” – सचिन सातव (नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद)

पालखी मुक्कामासाठी शारदा प्रांगणात पोहोचल्यानंतर नागवडे वस्ती–देशमुख चौक–शारदा प्रांगण हा संपूर्ण पालखी मार्ग अवघ्या एका तासाच्या आत स्वच्छ करण्यात आला. तसेच पालखीच्या प्रस्थानानंतर शहरातील मुख्य रस्ते, मैदान परिसर, मुक्कामस्थळे आणि पालखी मार्गावरील सर्व भाग पुन्हा केवळ एका तासाच्या आत स्वच्छ करून शहर पूर्ववत करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : हरिनामाच्या गजरात सातारा दुमदुमला! संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

या कामासाठी नगरपरिषदेचे सुमारे ४५० सफाई मित्र, १८ मुकादम, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे पालखी सोहळ्यादरम्यान आणि त्यानंतरही बारामती शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यात यश आले. बारामती शहरातून पालखीचे आगमन आणि प्रस्थान या दोन्ही टप्प्यांमध्ये नगरपरिषदेने केलेले नियोजन, स्वच्छता आणि व्यवस्थापन यामुळे वारकरी, भाविक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. बारामतीच्या स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या परंपरेला साजेसे काम यंदाही नगरपरिषदेने करून दाखवले आहे.

“बारामती नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत पालखी आगमन आणि प्रस्थानानंतर संपूर्ण शहराची स्वच्छता व सुव्यवस्था अबाधित राखली.” – पंकज भुसे (मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद.)

Web Title: The baramati municipal council cleaned up baramati city within just one hour after the palkhi procession

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • baramati
  • Palkhi Sohala
  • Sant Tukaram Maharaj

संबंधित बातम्या

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी
1

Baramati: बारामतीच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; साठवण क्षमता वाढवण्यासाठी ॲड सुभाष ढोले नगरपरिषदेकडे मागणी

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव
2

Baramati Agricultural News:बारामती बाजार समितीत प्रति क्विंटल ज्वारीचा भाव १० हजारांवर; उडीद, हरभरा, बाजरीलाही चांगला भाव

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
3

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटाला ‘मिसिंग लिंक’ची गरज! वाढती वाहतूक अन् विमानतळाच्या पुरंदर पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाची मागणी
4

पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटाला ‘मिसिंग लिंक’ची गरज! वाढती वाहतूक अन् विमानतळाच्या पुरंदर पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गाची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.