Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी(दि. १५) पासून पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर सुरू होताच पहिल्याच दिवशी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 15, 2026 | 05:13 PM
भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले, ऑनलाईन पास अनिवार्य; पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Follow Us
Follow Us:

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी(दि. १५) पासून पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर सुरू होताच पहिल्याच दिवशी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, सध्या केवळ ऑनलाईन नोंदणी केलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जात असल्याने प्रशासनाने विनानोंदणी भाविकांनी मंदिरात येऊ नये, असे आवाहन केले आहे.

 

२०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारणी, पायरीमार्ग सुधारणा आणि विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी ९ जानेवारीपासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे, जवळपास एक वर्ष लागण्याचा अंदाज असलेले सभामंडपाचे काम अवघ्या पाच महिन्यांत अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

दररोज केवळ एक हजार भाविकांना प्रवेश

मंदिर प्रशासनाने १५ जून ते ३० जून या कालावधीत सकाळी ७ ते ११ या वेळेत दर्शनाची व्यवस्था केली आहे. दररोज केवळ एक हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार असून त्यासाठी संकेतस्थळ:https://shreebhimashankar.com येथे ऑनलाईन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. ५ जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून नोंदणी केलेल्या भाविकांनी वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. सध्या सभामंडपावरील घुमट तसेच पायरीमार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून ते पूर्ण झाल्यानंतर मंदिर सर्व भाविकांसाठी निर्बंधमुक्त खुले करण्यात येणार आहे. तोपर्यंत मंदिर प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा, अन्यथा…; शिरुरमध्ये वीज ग्राहक संघटनेचा इशारा

शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेला प्रतिसाद देण्याचे आवाहन

स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि भिमाशंकर संस्थान यांच्या सहकार्यामुळे मुख्य सभामंडपाचे काम अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले. दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा आणि गर्दी व्यवस्थापनाची पायाभूत कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामेही जलदगतीने पूर्ण केली जात आहेत. भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध दर्शन व्यवस्थेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

पाच महिन्यांनंतर भगवान भीमाशंकरांचे दर्शन घेण्याचे भाग्य अनेक भाविकांना लाभले. ऑनलाईन नोंदणीमुळे व्यवस्था शिस्तबद्ध झाली आहे. विकासकामे पाहून समाधान वाटले. मंदिर परिसराचा होत असलेला कायापालट भाविकांसाठी निश्चितच लाभदायक ठरणार आहे. -विकास बेंगडे, भाविक.

Web Title: The bhimashankar temple has been opened to devotees for darshan starting monday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • bhimashankar
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
4

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.