Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटसमध्ये राजे उमाजी नाईक फलकाची तोडफोड; जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक

दौंड तालुक्यातील पाटस येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्तंभावरील विद्युत रोषणाईयुक्त फलकाची अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2026 | 05:27 PM
पाटसमध्ये राजे उमाजी नाईक फलकाची तोडफोड; जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक

पाटसमध्ये राजे उमाजी नाईक फलकाची तोडफोड; जय मल्हार क्रांती संघटना आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्तंभावरील विद्युत रोषणाईयुक्त फलकाची अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (दि. २८) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडल्याचा आरोप जय मल्हार क्रांती संघटनेने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना, समाजबांधव आणि ग्रामस्थांनी पाटस पोलिस चौकीवर मुक मोर्चा काढत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले.

 

प्राथमिक माहितीनुसार, पाटस येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जुना बाजारतळ परिसरातील क्रांतीस्तंभावर लावण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक फलकासह जय मल्हार क्रांती संघटनेच्या नावाच्या फलकाचीही दगडफेक करून तोडफोड करण्यात आली. शनिवारी सकाळी हा प्रकार जय मल्हार क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ खोमणे यांच्या निदर्शनास आला. घटनेची माहिती मिळताच संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब गाडेकर व पोलिस हवालदार जालिंदर बंडगर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली; मात्र संबंधित घटना कॅमेऱ्यात कैद न झाल्याने तपासात अडचणी येत आहेत.

तातडीने कारवाई करण्याची मागणी

या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते बापूसाहेब खोमणे, तालुका अध्यक्ष दादासाहेब खोमणे, उपसरपंच बाबा कोळेकर तसेच पंचायत समिती सदस्य शिवाजी ढमाले यांच्यासह ग्रामस्थांनी पाटस पोलिस चौकीवर मुक मोर्चा काढला. महापुरुषांची बदनामी व विटंबना करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पोलिसांनी संबंधितांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटनेने रविवारी (दि. २९) पाटस गाव बंदची हाक दिली होती.

सीसीटीव्ही कॅमेरे बंद; ग्रामस्थांत नाराजी

पाटस ग्रामपंचायतीने मुख्य रस्ते व चौकांमध्ये मोठा खर्च करून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक ठिकाणी बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्रामस्थांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कॅमेरे बंद असल्याने गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांनाही अडचणी येत आहेत. ग्रामपंचायतीने तातडीने कॅमेरे दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: The jai malhar kranti sanghatana has become aggressive following the vandalism of the plaque of raje umaji naik in patas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Daund Crime
  • Patas

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
1

महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प
2

Bhimashankar Temple : मंदिर बंदीचा व्यावसायिकांना फटका; साडेतीन महिन्यांपासून अर्थचक्र ठप्प

प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना मूळ शाळेत परतण्याचे आदेश; मे महिन्याचे वेतन रोखण्याचाही इशारा
3

प्रतिनियुक्तीवरील शिक्षकांना मूळ शाळेत परतण्याचे आदेश; मे महिन्याचे वेतन रोखण्याचाही इशारा

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे…
4

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.