Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता 10 क्षेत्रीय कार्यालये; 30 स्वीकृत सदस्यपदांसाठी भाजपमध्ये चुरस

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याने पालिकेचे कामकाज गतिमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठवरून दहा करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2026 | 05:49 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता 10 क्षेत्रीय कार्यालये; 30 स्वीकृत सदस्यपदांसाठी भाजपमध्ये चुरस

पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता 10 क्षेत्रीय कार्यालये; 30 स्वीकृत सदस्यपदांसाठी भाजपमध्ये चुरस

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याने पालिकेचे कामकाज गतिमान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या आठवरून दहा करण्यात आली आहे. १ जुलैपासून या कार्यालयांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले असून, १३ जुलै रोजी समिती अध्यक्षांची निवडही पार पडली आहे. आता सर्वांचे लक्ष क्षेत्रीय समित्यांच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे लागले असून, तब्बल ३० कार्यकर्त्यांना या पदावर संधी मिळणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपमध्ये इच्छुकांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

 

महापालिकेत स्वीकृत नगरसेवकपदाचा निकाल अद्याप प्रलंबित असल्याने, नाराज कार्यकर्त्यांकडून ‘स्वीकृत नगरसेवकपद नाही तर किमान क्षेत्रीय सदस्यपद तरी द्या’, अशी मनधरणी नेत्यांकडे केली जात आहे. पुनर्रचनेनंतर सर्व १० क्षेत्रीय कार्यालये आणि त्यांच्या अध्यक्षपदांवर भाजपचेच वर्चस्व आहे. त्यामुळे या जागांवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी आमदार, शहराध्यक्ष, महापौर व पक्षनेत्यांकडे विविध माध्यमांतून ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.

लवकरच निवड प्रक्रिया : नगरसचिव

या प्रक्रियेबाबत पालिकेचे नगरसचिव मुकेश कोळप यांनी सांगितले की, “दहा क्षेत्रीय कार्यालये अस्तित्वात आली असून अध्यक्ष निवडीनंतर आता लवकरच स्वीकृत सदस्यांची निवड प्रक्रिया राबवली जाईल. ही प्रक्रिया क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पार पडेल. प्रत्येक कार्यालयासाठी ३ याप्रमाणे एकूण ३० सदस्यांची निवड होईल. यासाठी उमेदवार सामाजिक कार्यकर्ता आणि संबंधित क्षेत्रीय क्षेत्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.”

हे सुद्धा वाचा : 16 घरफोड्यांचा पोलिसांनी लावला छडा, दोन सराईत चोरट्यांना ठोकल्या बेड्या; तब्बल लाखोंचे दागिने जप्त

अधिकार व महत्त्व

क्षेत्रीय समितीवर निवड होणाऱ्या स्वीकृत सदस्यांना समितीच्या शासकीय सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असतो. तसेच आपल्या भागातील नागरी समस्या मांडणे आणि विकासकामे सुचवणे यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. लोकसंख्येच्या दबावामुळे प्रशासकीय सोयीसाठी प्रभागांची फोडाफोड करून भाजप सरकारने हा निर्णय घेतला होता. आता आपल्या हक्काच्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पक्षाकडून या ३० जागांचा वापर कसा केला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा : सासवड पोलिसांची मोठी कारवाई, गाई अन् म्हशी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; तब्बल…

Web Title: The number of zonal offices of the pimpri chinchwad municipal corporation has increased

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Ravi Landge

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
3

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’
4

School Girls Video: तेच विद्यार्थी, तोच खड्डेमय रस्ता! खांडपे-कोंदिवडे रस्त्यावर पुन्हा खड्डे, ‘राजकारण्यांची आश्वासने कुठे गेली?’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.