संग्रहित फोटो
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर विठ्ठलमय झाले असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. वारीसाठी आलेल्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाने स्वतःवर बंदुकीने गोळ्या झाडून आपले जीवन संपवले आहे. ऐन महापूजेच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलासह पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे.
महापूजेवेळीच घडला थरार
शासकीय महापूजेच्या वेळीच काळजाचा ठोका चुकवणारा थरार घडला. रामेश्वर ध्रुपद साबणे (वय ३०) असे आत्मबलिदान देणाऱ्या दुर्दैवी जवानाचे नाव आहे. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवासी होते. आषाढी एकादशीचला पहाटे अडीचच्या सुमारास विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या रामेश्वर यांनी सर्व्हिस रायफलमधून स्वतः वर गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात तैनात असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने रामेश्वर साबणे यांचा जागीच मृत्यू झाला होता.
कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या
किरकोळ कारणावरून पती-पत्नीत वाद होऊन अबोला झाला. या तणावातून नंदिनी मंगलकर (वय ४५, रा. मिरे ले-आऊट, नंदनवर) हिने घरी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदीनीचे पती महेश व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे. पाच दिवसांपूर्वी पती-पत्नीत क्षुल्लक वाद झाला. नंदीनीने मनावर ताण घेतला. दोघांत अबोला आणि दुरावा वाढला. परंतु, तिला हे सहन झाले नाही. घटनेच्या दिवशी २३ जुलैला पती नेहमीप्रमाणे कामानिमित्त बाहेर होते. मुलगी शिकवणी वर्गाला गेली. तोपर्यंत मुलगा घरी आईशी बोलत होता. सासू घरातच होती. शिकवणी वर्ग सुटण्याची वेळ झाल्याने मुलगा बहिणीला आणायला गेला. दरम्यान, नंदिनीने बेडरूममध्ये ओढणीने गळफास लावून आपला जीवन प्रवास थांबवला.






