Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; ‘या’ तारखेला होणार लोकार्पण

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या १० फूट उंचीचा ब्राँझ धातूपासून बनवलेल्या पुतळ्याचे लोकार्पण गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बारामती येथे होणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 19, 2026 | 05:07 PM
अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; 'या' तारखेला होणार लोकार्पण

अजित पवारांचा पहिला पूर्णकृती पुतळा बारामतीत; 'या' तारखेला होणार लोकार्पण

Follow Us
Follow Us:

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या १० फूट उंचीचा ब्राँझ धातूपासून बनवलेल्या पुतळ्याचे लोकार्पण गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बारामती येथे होणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडणार असून, खासदार पार्थ पवार, जय पवार तसेच पवार कुटुंबीय या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याबाबतची माहिती नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी दिली.

 

बारामतीतील नटराज नाट्य कला मंडळाच्या पुढाकारातून अजित पवार यांचा सुमारे १० फूट उंचीचा ब्राँझ धातूपासून तयार करण्यात आलेला भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा नटराज कलादालनासमोरील जागेत प्रतिष्ठापित करण्यात येणार असून, बारामतीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासात हा सोहळा महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात बुधवार, दिनांक २२ जुलै रोजी पुतळ्याच्या पाद्य पूजनाने होणार आहे. त्यानंतर गुरुवार, दिनांक २३ जुलै रोजी सकाळी लोकार्पण सोहळा पार पडेल. याचवेळी अजित पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित छायाचित्र दालनाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.

तसेच सर्वधर्मीय प्रार्थना, श्रद्धांजलीपर गीत, भजन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकार्पण सोहळ्यास बारामतीसह परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, महिला, युवक आणि अजितदादा पवार यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर यांनी सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि भाविकांनी या ऐतिहासिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजितदादा पवार यांना अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा : सासवड पोलिसांची मोठी कारवाई, गाई अन् म्हशी चोरणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; तब्बल…

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एक हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.

Web Title: The unveiling of ajit pawars first full size statue will take place in baramati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ
1

Baramati Suicide : बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या; परिसरात खळबळ

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला
2

Sunetra Pawar on Supriya Sule : ‘अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण करू नका,’ सुनेत्रा पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.