Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील ‘या’ महामार्गावर प्रवाशांचा संताप अनावर; तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता वाहनचालकांसाठी ‘वीकेंडची शिक्षा’ ठरू लागला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याची बाब झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 10, 2026 | 12:39 PM
राज्यातील 'या' महामार्गावर प्रवाशांचा संताप अनावर; तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

राज्यातील 'या' महामार्गावर प्रवाशांचा संताप अनावर; तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता वाहनचालकांसाठी ‘वीकेंडची शिक्षा’ ठरू लागला आहे. प्रत्येक शनिवार-रविवारी महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता नित्याची बाब झाली असून, शनिवारी (दि. ९) आळेखिंड परिसरात तब्बल तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याने प्रवाशांचे अक्षरशः हाल झाले आहेत. रखडलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामामुळे आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे महामार्गावर पुन्हा एकदा ‘महाजाम’ची परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

सध्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने ती वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी पुणे आणि नाशिक या दोन्ही दिशेची वाहतूक एकाच बाजूच्या अरुंद लेनमधून सुरू आहे. शनिवार असल्याने सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या पर्यटकांची, खासगी वाहनांची, मालवाहू ट्रकांची आणि एसटी बसांची मोठी गर्दी महामार्गावर उसळली. वाहनांचा ताण वाढताच आळेखिंड परिसर अक्षरशः ठप्प झाला. वाहनांच्या रांगा इतक्या वाढल्या की अनेक ठिकाणी चालकांनी इंजिन बंद करून गाड्यांतच थांबण्याचा पर्याय निवडला.

उष्णतेमुळे प्रवाशांचे हाल अधिकच

उन्हाच्या तीव्र झळा आणि वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे प्रवाशांचे हाल अधिकच वाढले. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या कोंडीत सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी भीषण होती की रुग्णवाहिकांनाही वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. काही ठिकाणी वाहनचालकांनी बाजू देण्याचा प्रयत्न केला, मात्र अरुंद झालेल्या रस्त्यामुळे रुग्णवाहिका मिनिटोमिनिट अडकून पडत होती. आपत्कालीन सेवांची अशी झालेली अवस्था पाहून प्रवाशांमधून संताप व्यक्त होत होता.

प्रशासनाचे दुर्लक्ष

इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झालेली असतानाही आळेखिंड परिसरात महामार्ग पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त दिसून आला नाही. पोलिसांची अनुपस्थिती पाहून काही बेशिस्त वाहनचालकांनी विरुद्ध दिशेने वाहने घुसवण्यास सुरुवात केली. त्यामुळे आधीच अस्ताव्यस्त झालेली वाहतूक आणखी कोलमडली. किरकोळ धक्काबुक्की,वादावादी आणि हॉर्नच्या कर्कश आवाजामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन तासांपासून गाडी इंचभरही पुढे सरकत नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, सावली नाही आणि उन्हामुळे गाडीत बसणंही कठीण झालं आहे, अशी व्यथा अविनाश पिंगळे या प्रवाशाने व्यक्त केली. तर काही वाहनचालकांनी काम सुरू आहे हे मान्य; पण वाहतुकीचे योग्य नियोजन तरी असावे, अशी प्रतिक्रिया दिली.

हे सुद्धा वाचा : कोर्टाने सील केलेल्या दुकानांचे कुलूपच तोडले; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महामार्गावरील कामाचा वेग वाढवावा

शनिवारी पुण्याकडून नाशिकच्या दिशेने वाहनांची मोठी गर्दी होती रविवारी सुट्टी संपल्यानंतर नाशिक, संगमनेर आणि उत्तर महाराष्ट्रातून पुण्याकडे परतणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार असल्याने आज दुपारनंतर पुन्हा महामार्गावर प्रचंड कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महामार्गावरील कामाचा वेग वाढवावा,पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी, प्रत्येक गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी आणि आठवड्याच्या शेवटी विशेष नियोजन राबवावे, अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Web Title: There is a lot of traffic congestion on the pune nashik national highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 12:39 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Traffic News
  • Traffic Police

संबंधित बातम्या

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा
1

वडगाव एमआयडीसी महामार्गावरील वाहतूक सुरळीत! विशाल लॉन्स चौकातील वाहतूक कोंडीवर पोलिसांनी काढला तोडगा

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
3

साईबाबांच्या नगरीत ‘मॅफेड्रोन’ ड्रगचा शिरकाव! छुप्या टोळ्या सक्रिय, पालकांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
4

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.