कोर्टाने सील केलेल्या दुकानांचे कुलूपच तोडले; दोघांविरोधात गुन्हा दाखल
पिंपरी : एमआयडीसी भोसरी परिसरातील न्यायालयीन आदेशानुसार सील करण्यात आलेल्या दुकानांचे सील तोडून तेथे दुसरे कुलूप लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
याप्रकरणी संदीप प्रकाश पाटील (वय ४२, रा. नवी सांगवी, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र अजित सिंग सोहळ आणि त्यांची पत्नी नीलम सोहळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणीनगर येथील जयदीप बिझनेस सेंटर अपार्टमेंट कंडोमिनियमच्या तिसऱ्या मजल्यावरील शॉप क्रमांक ०७ आणि ०८ हे न्यायालयीन आदेशानुसार कोर्ट कमिशनर यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले होते.
संबंधित दुकाने डीसीबी बँक लिमिटेडच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र, २९ मार्च ते ७ मे या कालावधीत आरोपींनी संबंधित दुकानांचे सील तोडून तेथे दुसरे कुलूप लावल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
प्रसिद्ध बिल्डरसह 40 जणांविरोधात गुन्हा दाखल
वडगाव शेरीतील एका प्लॉटवर ट्रॅक्टर, डंपर व वॉटर टँकर घुसवून कम्पाऊंड गेट तोडत जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रसिद्ध बिल्डर अमित लुकंडसह ४० जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ताब्यावेळीच येथील सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया यांच्यासह ३० ते ४० जणांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : नसरापूर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट; वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार
घोटाळे हे अनेक प्रकारचे तुम्ही ऐकले असतील पण लग्नाच्या स्कॅमविषयी तुम्ही कधी ऐकले आहे का? इंदूरची २० वर्षीय सलोनी सोलंकी अशाच एका स्कॅम चालवत होती ज्यात तिने लग्नाच्या आमीषाने तब्बल ९ तरुणांची फसवणूक केली. आपल्या दहाव्या लग्नासाठी ती बुलढाणा येथे आली असता पोलिसांनी तिला अटक केली आणि तिची खरी ओळख उघड झाली.






