Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे एका टेम्पो चालकाचा जीव वाचला आहे. धाडसी कामगिरीबद्दल घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 07, 2026 | 12:54 PM
टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

टेम्पो वाहताना चालकाला काढले बाहेर, वाहतूक पोलिसांमुळे वाचला जीव; पुण्यातील घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि धाडसी बचावकार्यामुळे एका टेम्पो चालकाचा जीव वाचला आहे. बोपोडी अंडरपासमध्ये साचलेल्या पाण्यात टेम्पो घातल्यानंतर टेम्पोसह चालक वाहून जाऊ लागला. पण, समोर असलेल्या पोलिसांनी पाण्यात उतरून त्या चालकाला टेम्पोतून बाहेर काढत दोरीने सुखरूप काठावर आणले. पोलिसांच्या या शौर्याचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. सोमवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार निलेश पुकाळे आणि हवालदार नितीन कारले अशी या घाडसी कामगिरी करणाऱ्या दोघा पोलिसांची नावे आहेत. पुकाळे व कारले हे खडकी वाहतूक विभागात कर्तव्यास आहेत. दरम्यान, रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस सोमवारी देखील सुरूच होता. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; अनेक ठिकाणी पावसाचा हाहा:कार

दरम्यान, राहुल पाटोले (टेम्पो क्रमांक एमएच-१२ वायके-४३०४) हे बोपोडी चौकातून आंबेडकर चौकाच्या दिशेने टेम्पो घेऊन जात होते. येथील अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याठिकाणी काही क्षणांत टेम्पो पाण्यात अडकला आणि वेगवान प्रवाहामुळे वाहू लागला. हे पाहताच वाहतूक शाखेचे हवालदार निलेश पुकाळे आणि हवालदार नितीन कारले यांनी क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेतली. दोघांनी दोरीच्या साहाय्याने चालकापर्यंत पोहोचून त्याला सुखरूप बाहेर काढले. धाडसी कामगिरीबद्दल घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

हे सुद्धा वाचा : आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, रखडलेल्या पेरण्यांना आला वेग; खरीप हंगामासाठी आवश्यक वातावरण तयार

पाटणमध्ये दरड कोसळून तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मावळ तालुक्यात सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसाने भीषण रूप धारण केले असून, पाटण गावात घडलेल्या दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतर मावळ तालुक्यातील सर्व दरडप्रवण गावांचे तातडीने भूगर्भीय सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे, तसेच अशा भागांमध्ये कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Traffic police in pune have saved the life of a tempo driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Pune Rain

संबंधित बातम्या

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून
1

पालखीसाठी उभारलेल्या सुविधांवर पाणी; अन्नदानासह स्वागत मंडप अन् आरोग्य केंद्र गेले वाहून

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; अनेक ठिकाणी पावसाचा हाहा:कार
3

पुणे, मुंबई, पालघरसह काही जिल्ह्यांतील शाळांना आज पुन्हा सुट्टी; अनेक ठिकाणी पावसाचा हाहा:कार

पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? सिंहगड, लोणावळ्यासह घाटमाथ्यावर हाय-अलर्ट; वन विभागाकडून ‘हा’ महत्त्वाचे आवाहन
4

पुणेकरांनो ट्रेकिंगला जाताय? सिंहगड, लोणावळ्यासह घाटमाथ्यावर हाय-अलर्ट; वन विभागाकडून ‘हा’ महत्त्वाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.