Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष उमेश भीमराव कोकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, यापुढे शरद पवार गटासोबत कोणत्याही प्रकारची युती करू नये, अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 18, 2026 | 06:41 PM
सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

सतत भूमिका बदलणाऱ्या शरद पवार गटासोबत यापुढे युती करु नका; पुण्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्याची सपकाळांकडे मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : येत्या ऑगस्ट 22तारखेला पुणे येथे आयोजित राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे खडकवासला विधानसभा मतदारसंघात आले होते. या दौऱ्यादरम्यान खडकवासला विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचे अध्यक्ष उमेश भीमराव कोकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना मांडत, यापुढे शरद पवार गटासोबत कोणत्याही प्रकारची युती करू नये, अशी आग्रही मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. यावेळी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा दीप्ती चौधरी, ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सदस्या रेहाना चिस्ती, महिला नेत्या अर्चना शहा, ज्येष्ठ नेते लहू निवगुणे यांच्यासह खडकवासला मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेश कोकरे यांनी म्हटले आहे की, “शरद पवार गटाच्या सतत बदलत राहणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान होत आहे. त्यांच्या या धरसोड वृत्तीचा थेट फायदा भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि महायुतीतील इतर पक्षांना मिळत आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच अत्यंत प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ भूमिका घेतो, मात्र युतीमधील मित्रपक्षांच्या अशा धोरणांमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. खडकवासला मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी असून, पक्षाने आता स्वावलंबी होऊन लढण्याची गरज आहे. सातत्याने भूमिका बदलणाऱ्या पक्षासोबत राहण्यापेक्षा काँग्रेसने स्वबळावर किंवा अधिक ठामपणे जनतेसमोर जावे, असे यावेळी कोकरे म्हणाले. कोकरे यांच्या मागणीला खडकवासला मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला आहे.

हे सुद्धा वाचा : चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खडकवासला मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना शांतपणे ऐकून घेतल्या. स्थानिक पातळीवरील या राजकीय परिस्थितीची आणि कार्यकर्त्यांच्या मागणीची दखल वरिष्ठ पातळीवर निश्चित घेतली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. या बैठकीमुळे खडकवासला मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नव्या राजकीय ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे सुद्धा वाचा : शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून ‘या’ मोहिमेची होणार सुरुवात

Web Title: Umesh kokare of the khadakwasla congress has made a major demand to harshvardhan sapkal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • pune news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..
1

Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..

शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून ‘या’ मोहिमेची होणार सुरुवात
2

शहरातील समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 20 तारखेपासून ‘या’ मोहिमेची होणार सुरुवात

पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय; मध्यरात्री 12 वाजल्यापासून ‘हा’ आदेश लागू
3

पुणे पोलिसांनी घेतला मोठा निर्णय; मध्यरात्री 12 वाजल्यापासून ‘हा’ आदेश लागू

शिरूर तालुक्यात 5485 शिधापत्रिकांवरील धान्य बंद; सहाय्यक पुरवठा अधिकारी दीपक केदार यांची माहिती
4

शिरूर तालुक्यात 5485 शिधापत्रिकांवरील धान्य बंद; सहाय्यक पुरवठा अधिकारी दीपक केदार यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.