Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  

स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण देशातून विविध स्तरावरील पुरस्कार पटकावून आदर्श ठरलेल्या पुरंदर तालुक्यातील सासवड शहराची अस्वछतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. रस्त्यावर कचरा साठत असून घंटागाडी वेळेला येतही नाही.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 23, 2026 | 05:06 PM
सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  

सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  

Follow Us
Follow Us:

सासवड : स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण देशातून विविध स्तरावरील पुरस्कार पटकावून आदर्श ठरलेल्या पुरंदर तालुक्यातील सासवड शहराची अस्वछतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. रस्त्यावर कचरा साठत असून घंटागाडी वेळेला येतही नाही. अनेक दिवसापासून गढूळ पाणी पिण्यासाठी येत आहे. नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधात सासवडमधील जनता आक्रमक झाली असून महिलांनी प्रशासनाच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. कचऱ्याच्या बदल्या थेट नगर परिषदेत घेवून जोरदार निषेध केला आहे.

सासवड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील महिला जोरदार आक्रमक झाल्या. तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, गढूळ पाणीपुरवठा, रस्त्यावरील साठलेला कचरा अशा अस्वच्छतेच्या समस्यांमुळे त्रस्त झाल्याने नगरपालिकेच्या मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्या दालनात बदल्यामध्ये कचरा आणून अनोखे आंदोलन केले. सहा-सहा दिवस कचरा उचलला जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नळाला गढूळ व आरोग्यास बाधक पाणी येत असल्याची तक्रारही महिलांनी केली. रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटला लावण्यात आलेले छोटे बल्ब अपुरा प्रकाश देत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कचरा गाडीवरील चालकांची अरेरावी, कांबळेश्वर मंदिर परिसरातील कचरा डेपो, तसेच नमो उद्यानातील काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांचे अवैध वास्तव्य विविध प्रश्न उपस्थित करून महिलांनी प्रशासनासमोर मांडले.

समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू

नगरसेविका हेमलता इनामके, दिपाली जगताप, सासवडचे भाजप शहराध्यक्ष आनंद जगताप, शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद इनामके, सुरेखा जगताप, जयश्री जगताप, संगीता भिंताडे, भाग्यश्री जगताप, दीपाली खेनट, सविता फडतरे, सुनिता महामुनी, योगिता काकडे, सुनिता यादव, अपेक्षा जगताप, अर्चना जगताप, अंकिता जगताप यांच्यासह इतर महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण हे कार्यालयात उपस्थित नसल्याने नगरपालिकेच्या वतीने ओंकार शिंदे आणि सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक राजन जगताप यांनी आंदोलक महिलांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल व प्रश्नांवर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

हे सुद्धा वाचा : १२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

ठोस तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलन

आठ दिवसांत प्रशासनाने सासवड मधील समस्या सोडवाव्यात. दररोज नियमितपणे घंटागाडी सुरू करून साचलेल्या कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावावी. मागील २० वर्षांपासून प्रलंबित रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. आरोग्याचा धोका टाळण्यासाठी परिसरात योग्य ड्रेनेज व्यवस्था त्वरित उभी करावी. तसेच नागरिकांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रश्नांवर ठोस तोडगा काढला नाही तर नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेविका हेमलता इनामके आणि दिपाली जगताप यांनी दिला.

Web Title: Women from saswad staged a vigorous protest against the administration at the nagapalika office

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Saswad
  • Saswad News

संबंधित बातम्या

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
1

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
2

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
3

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
4

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.