प्रा. विलास कथुरे पुरस्काराने सन्मानित (फोटो- सोशल मिडिया)
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकी लिजेंड पद्मभूषण मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कार समिती, दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड व कालीरमन फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे हा सन्मान हिंदकेसरी पैलवान दिनानाथ सिंह व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल, कराड) येथे प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड व कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्रा. विलास कथुरे यांनी कुस्ती खेळासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. ते भारतीय कुस्ती संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात पंच आहेत. तसेच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सहसचिव व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.
आशियाई कुस्ती स्पर्धा, राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा व जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारतीय कुस्ती संघाचे प्रशिक्षक व जागतिक कुस्ती संघटनेचे निष्णात पंच म्हणून त्यांनी जवळपास २८ देशांमध्ये सहभाग घेतला आहे. ते गुरु द्रोणाचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाला हिंदकेसरी पै. संतोष आबा वेताळ, डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे, प्रा. संजय दुधाने, प्रा. नितीन शिंदे, प्रा. अमोल साठे, बाबा मते आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
80 सेकंदांत पाकिस्तानचा खेळ खल्लास! संग्राम सिंगने आशियाई MMA किताबावर कोरले नाव






