पुणे : वाढत्या गुन्हेगारी घटनांनी पुणेकर हैराण असून, शहरात तोडफोडीच्या घटना दहशत माजवत असतानाच जबरी चोरीच्या घटनादेखील सातत्याने घडत आहेत. या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून, शहरात एका दिवसात जबरी चोरीचे पाच, तर एक दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
धक्कादायक, म्हणजे, स्वारगेट पोलीस लाईनमध्येच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले आहे. सुदैवाने महिलेने आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांच्या मदतीने त्या चोरट्याला पकडण्यात पोलीस ‘नशीबवान’ राहिले आहेत. परंतु, चोरट्यांचे धाडस दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे दिसत आहे.
तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला
शिवाजीनगर येथील नाना-नानीपार्क येथून मोबाईवर गाणी ऐकत चालेल्या तरुणाचा मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी फारूक कुतुबुद्दीन शेख (२३, रा. शिवाजीनगर) याने तक्रार दिली आहे. त्यावरून आकाश काळू मोघे (२२) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार १८ मार्च रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडला.
जबरदस्तीने खिशातील ४ हजार २०० रुपयांची चोरी
दुसऱ्या घटनेत “तुला इथे धंदा करायचा असेल, तर महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत दोघांनी गचांडी पकडून हत्यार दाखवत जबरदस्तीने खिशातील ४ हजार २०० रुपये जबरी चोरी करून नेले. तसेच, आम्ही येथील भाई आहोत म्हणून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. भूप्रेंद्र शिंदे आणि सचिन मारणे यांना अटक केली आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
तर दिनेश वांजळे नावाच्या एकावरही गुन्हा दाखल केला आहे. याबाबत परेश ईश्वरदास भागचंदानी (वय ४२, रा. उत्तमनगर) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार १७ मार्चला रात्री सव्वा आठच्या सुमारास घडला. आरोपींच्या दहशतीमुळे व ते करीत असलेल्या शिवीगाळीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
तसेच, पत्नीला शाळेच्या गेटवर थांबवून मुलाला शाळेत आणण्यासाठी गेल्यानंतर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेची 2 लाख ४० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर चंदननगर पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार 18 मार्चला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खराडी येथील लिटील मिलेनियम स्कूल येथे घडला.
४५ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी जबरी चोरी
याबाबत २८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. देवाची उरूळी येथील जुन्या पालखी रस्त्याने पायी जाणार्या ३० वर्षीय महिलेची ४५ हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी जबरी चोरी करून नेली. याप्रकरणी दोन अनोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत ३० वर्षीय महिलने तक्रार दिली आहे. तसेच, स्वारगेट पोलीस लाईनमधील मोकळ्या ग्राउंडसमोरील रस्त्यावर भरदुपारी घडली आहे. ज्येष्ठ महिला दुपारी पायी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांने त्यांची सोनसाखळी हिसका मारून चोरून नेली. यावेळी चोरट्यांने 66 हजारांची सोनसाखळी चोरी करून नेली. याघटनेत चोरट्याला अटक केली आहे.
सुरक्षारक्षकाला धमकावून चंदनचोरी
कोरगाव पार्क येथील एकांतिका अपार्टमेंटमधे शिरून सुरक्षा रक्षकाला तलवारीचा धाक दाखवत दरोडा टाकून सहा जणांच्या टोळक्याने चंदनाचे झाड कापून चोरून नेले. याप्रकरणी सहा अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी १५ हजारांचे चंदनाचे झाड कापून चोरी करून नेले. राजाराम नारायण बोडू (57, रा. तुषार हौसिंग सोसायटी, ताडीवाला रोड) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार १८ मार्च रोजी पहाटे तीन ते पावणे चारच्या सुमारास घडला.






