Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport भूसंपादनाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ! सात गावांतील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Purandar Airport - राज्य सरकारच्या निर्णयानुसार, पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, एखतपूर, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी आणि मुंजवडी या सात गावांमधील सुमारे १,२१६ हेक्टर अर्थात जवळपास ३,००० एकर जमीन विमानतळासाठी निश्चित केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 13, 2026 | 04:13 PM
Purandar Airport, Pune News, Land Acquisition, Maharashtra Infrastructure,

Purandar Airport, Pune News, Land Acquisition, Maharashtra Infrastructure,

Follow Us
Follow Us:
  • विमानतळाच्या भूसंपादन आणि मोबदला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ
  • विमानतळ प्रकल्पासाठी एकूण १,२१६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार
  • जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी, हक्कसोडपत्रे तसेच इतर महसुली प्रक्रिया अद्याप प्रलंबित
Purandar Airport News: पुरंदर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासंबंधी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आली आहे. विमानतळाच्या भूसंपादन आणि मोबदला स्वीकारण्याच्या प्रक्रियेला जिल्हा प्रशासनाने ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सात गावांतील शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ प्रकल्पासाठी एकूण १,२१६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ८५१ हेक्टर जमिनीबाबत शेतकऱ्यांनी संमतीपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. सुमारे ७० टक्के जमिनींचे करारनामे पूर्ण झाल्याने त्या क्षेत्राचे संपादन झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित जमिनींची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी मुदत वाढविण्यात आली आहे.

Assam Plane Crash : आसाममध्ये मोठा विमान अपघात! भारतीय वायुसेनेचे AN-32 मालवाहू विमान कोसळले

महसुली आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे विलंब

काही शेतकऱ्यांच्या जमिनींचे मूल्यांकन, न्यायालयीन दावे, नाव दुरुस्ती, वारस नोंदी, हक्कसोडपत्रे तसेच इतर महसुली प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. या कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर संमतीपत्र सादर करता आले नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींनी मुदतवाढीची मागणी केली होती.

३ हजार एकर क्षेत्रावर उभारला जाणार विमानतळ

राज्य सरकारच्या निर्णयानुसार, पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, एखतपूर, उदाचीवाडी, पारगाव, खानवडी आणि मुंजवडी या सात गावांमधील सुमारे १,२१६ हेक्टर अर्थात जवळपास ३,००० एकर जमीन विमानतळासाठी निश्चित केली आहे.

पॅकेज जाहीर झाल्यानंतर ७ मेपासून शेतकऱ्यांनी संमतीपत्रे देण्यास सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि सासवड येथील उपविभागीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Weather Update : देशातील 25 राज्यांत 18 जूनपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता; एल निनोचा प्रभाव दिसणार

एका महिन्यात ६० टक्के संमती

दरम्यान, विमानतळासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. त्यातून आतापर्यंत ७३५ हेक्टर क्षेत्रासाठी शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. खास बाब म्हणजे, एका महिन्यात सुमारे ६० टक्के भूसंपादन प्रक्रिया यशस्वी झाली आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे ९०० कोटी रुपयांचा मोबदला वितरित करण्यात आला आहे.

‘सर्च रिपोर्ट’मुळे प्रक्रिया संथ

जमिनींच्या मालकीची पडताळणी करणाऱ्या ‘सर्च रिपोर्ट’ प्रक्रियेस वेळ लागत असल्याने काही प्रकरणे रखडली आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने पाच वकिलांचे विशेष पथक नियुक्त केले आहे. तसेच अनेक जमिनींवरील दावे न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे उर्वरित संमतीपत्रे मिळण्यास विलंब होत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले.

पुरंदर विमानतळ उभरणी प्रकल्पाच्या भूसंपादनाला मिळणारा प्रतिसाद आणि वाढविण्यात आलेली मुदत यामुळे उर्वरित प्रक्रिया अधिक वेगाने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Purandar airport land acquisition deadline extended till june 30 by satara district administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Land Acquisition
  • pune news
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.