Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा दिला. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 29, 2025 | 07:04 PM
रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

रायगडच्या विकासाला निधीअभावी खीळ; MMRDA च्या रखडलेल्या कामांवरून माजी आमदार पंडित पाटील आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विकासकामांना निधीअभावी मोठी खीळ बसली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मार्फत हाती घेतलेली अनेक विकासकामे रखडली आहेत. या ठप्प कामांबाबत माजी आमदार पंडित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाकडे तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा, काम न करणाऱ्या ठेकेदारांच्या वर्कऑर्डर रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

५६५ विकासकामांना मंजुरी, पण फक्त ७०-७५ कामेच सुरू

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि स्थानिक आमदार दळवी साहेब यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यात MMRDA च्या माध्यमातून तब्बल ५६५ विकासकामांना मंजुरी देण्यात आली होती. यापैकी ३५० कामांचे कार्यआदेश (वर्कऑर्डर) दोन वर्षांपूर्वीच जारी करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात केवळ ७० ते ७५ कामांनाच निधी वितरित झाला असून उर्वरित कामे कागदावरच अडकून पडली आहेत.

Ahilyanagar News: आधी पावसाने झोडपलं त्यात खतांच्या दरवाढीने कंगाल केलं! शेतकऱ्यांच्या ‘रब्बी’ चे गणित बिघडले

निधीअभावी अनेक ठेकेदारांनी प्रत्यक्ष कामे सुरू करण्यास नकार दिल्यामुळे, गावागावांतील रस्ते व सार्वजनिक सुविधा प्रकल्प रखडले आहेत. परिणामी, अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्ह्याचा विकास ठप्प झाला आहे.

पाटील यांची प्रशासनाला ताकीद

माजी आमदार पंडित पाटील यांनी या संदर्भात MMRDA चे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर देवरे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

तीन ठोस मागण्या

  • MMRDA चा निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा.
  • दोन वर्षांपासून काम सुरू न केलेल्या ठेकेदारांची एजन्सी रद्द करून रिटेंडरिंग प्रक्रिया हाती घ्यावी.
  • रस्ते आणि विकासकामांमध्ये अडकलेला निधी मुक्त करून नागरिकांना दिलासा द्यावा.
त्यांनी स्पष्ट केले की, “अनेक रस्ते पावसाळ्यामुळे दुरवस्थेत आहेत. निधीअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने तातडीने निधी वितरित करून विकासाची गती वाढवावी.”

रायगड हा पर्यटन आणि औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा असूनही शासनाकडून निधी न मिळाल्याने विकास थांबलेला आहे. यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि उद्योग क्षेत्राला फटका बसत आहे.

शासनाकडे ठोस पावले उचलण्याची मागणी

“रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर निधी तात्काळ वितरित झाला पाहिजे. शासनाने लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा जनतेचा संयम सुटेल,” असा इशारा माजी आमदार पंडित पाटील यांनी दिला आहे. MMRDA मार्फत मंजूर झालेल्या शेकडो विकासकामांना निधीअभावी खीळ बसली आहे. पंडित पाटील यांनी शासनावर टीका करत ही परिस्थिती तातडीने सुधारावी, ठेकेदारांच्या निष्क्रियतेवर कारवाई करावी, आणि रायगडच्या विकासाला नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी केली आहे.

Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना सामोरे जाण्यासाठी घाबरत आहेत; संजय राऊतांची टीका

Web Title: Raigad development hampered due to lack of funds former mla pandit patil aggressive over mmrda stalled projects

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • maharashtra
  • MMRDA
  • raigad

संबंधित बातम्या

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
1

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
2

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.