हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर (संग्रहित फोटो : अपघात)
पुसद : बाहेरगावावरून राहत्या घरी दुचाकीने परतताना खंडाळा घाटामध्ये दुचाकी व कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 22) दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली. रमेश खिल्लारे असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथून त्यांच्या दुचाकीने पुसद येथे येत होते.
हेदेखील वाचा : उरुळी देवाची परिसरात भीषण अपघात; टँकरच्या चाकाखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू
खंडाळा घाटातील मोठी मारवाडी फाटाच्या आसपासच्या परिसरात पुसदवरून वाशीम मार्गे जात असलेल्या एका अज्ञात चारचाकी वाहनाची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली. अपघात एवढा भीषण होती की, या धडकेत दुचाकीस्वार खिल्लारे यांचा उजवा पाय कंबरेपासून पूर्ण नाहीसा झाला. त्यांच्या डोक्याला जबर इजा झाली. दरम्यान, चारचाकी वाहनाने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती तेथील उपस्थितांना होताच, गंभीर जखमी दुचाकीस्वाराला पुसद येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु, स्थिती अतिचिंताजनक असल्यामुळे त्यांना मेडिकेअर हॉस्पिटल पुसद येथे रेफर करण्यात आले. अतिरक्तस्त्रावामुळे व डोक्याला लागलेल्या गंभीर मारामुळे दुचाकीस्वारचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शवविच्छेदनासाठी मृतदेहाला शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. गुरुवारी (दि. 23) पोलिसांमार्फत शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे पंचनामा करण्यात आला. मृताच्या कुटुंबीयांमार्फत खंडाळा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मृताच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, पत्नी, आई, एक भाऊ, दोन बहिणी असा आप्तपरिवार आहे. घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलिस स्टेशनचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विजयसिंह – प्रतापसिंह ठाकूर यांनी केला. घटनेचा उर्वरित तपास खंडाळा पोलिस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पुण्यातील अपघातात एक वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
पुण्यातील हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांचा चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला. कृष्णा राहुल महतो असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालक विजयकुमार बालाजी फड (वय ३२, रा. खांदवेनगर, लोहगाव) याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत बबीतादेवी राहुल महतो (वय २२, सध्या रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी हडपसर (काळेपडळ) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.