पाळण्याच्या दोरीचा फास बसल्याने बालकाचा मृत्यू; खेळता-खेळता घडली घटना अन्... (File Photo)
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांचा चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालकावर गुन्हा दाखल केला. कृष्णा राहुल महतो असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालक विजयकुमार बालाजी फड (वय ३२, रा. खांदवेनगर, लोहगाव) याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत बबीतादेवी राहुल महतो (वय २२, सध्या रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी हडपसर (काळेपडळ) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, महातो दाम्पत्य सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरातील भंगार माल दुकानात कामाला आहे. दुकानाच्या पोटमाळ्यावर ते राहायला आहेत. मंगळवारी (२१ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास महातो यांचा एक वर्षांचा मुलगा कृष्णा भंगार माल दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याची आई बबीतादेवी यांनी त्याला चटईवर ठेवले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली तो सापडला. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता तो पसार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुण्यात बारमधील ग्राहकांना बेदम मारहाण; तब्बल 12 जणांवर गन्हा दाखल
दीर- भावजयचा मृत्यू
पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
महिला पोलिसाला कारने उडवले
राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.