औद्योगिक गॅस सिलेंडरचा टँकर उलटला, काही गॅस सिलेंडर लिकेज
खालापूर तालुक्यात सावरोली खारपाडा रोडवर पौध गावाजवळ केमिकल गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच हेल्प फौंडेशनच्या टिम ने तात्काळ धाव घेतली. दरम्यनान टाटा स्टील फायर ब्रिगेड टिम, खालापूर पोलीस, महसूल यंत्रणानी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले.
औद्योगिक क्षेत्रात हा गॅस टँकर पलटी झाल्याने रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी सावध गिरी ठेवत प्रत्यक्ष जाऊन लिकेज असलेले गॅस सिलेंडर बंद केले. या दरम्यान सर्व सुरक्षा यंत्रणा, फायर टेंडर आणि ॲम्बुलन्स त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आल्या. दरम्यान गाडीच्या मालकाशी संपर्क साधण्यात आला. पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अलकाईल अमाईन्स या कंपनीतील एक्सपर्ट देखील त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पोहोचले. सध्यातरी गॅस लिकेजचा धोका टळला असला तरी पलटी झालेला गॅस सिलेंडर सुरळीत करण्याचे काम चालू असून या मार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.