Raigad News: महाडच्या दासगाव खाडीत गाळाचा गंभीर प्रश्न; विकासात अडथळा, स्थानिकांची ठाम भूमिका
गॅस टंचाईचा असाही बसतोय फटका; लग्न सोहळे होईना नियोजित वेळेत
दरम्यान, २००५ आणि २०२१ मधील महापुराचा फटका लक्षात घेता गाळ उपसा महत्त्वाचा ठरतो. मात्र, ज्या ठिकाणी गाळ काढण्याची गरज आहे, त्या संगम भागाकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. दासगाव संगमावरील गाळ उपसा झाल्यास पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, असेही जाणकारांचे मत आहे. सावित्री व नागेश्वरी नद्यांच्या संगमावर साचलेला गाळ तातडीने काढणे गरजेचे आहे. त्यामुळे जलवाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळेल, असे मत दासगावचे ग्रामस्थ पांडुरंग सूर्यकांत निवाते यांनी व्यक्त केले.
परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या संगम परिसरातील गाळ काढून टाकल्यास नदीची खोली वाढेल आणि लहान होड्या तसेच गलबते पुन्हा सुरू होऊ शकतील, असा विश्वास स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. यामुळे पर्यटनासह प्रवासी वाहतुकीलाही चालना मिळेल. दासगाव हे पूर्वीचे बंदरस्थान असल्याने येथे सागरी व बंदर विकास महामंडळामार्फत जेट्टीचे कामही करण्यात आले आहे. त्यामुळे जलमार्ग सुरू झाल्यास या सुविधांचा प्रभावी वापर होऊ शकतो.
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी, ताबा मिळावा म्हणून SIT चा अर्ज
दासगाव परिसरात सावित्री नदी, नागेश्वरी नदी आणि खाडी यांचा संगम असल्याने येथे मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. काही वर्षांपूर्वी गाळ उपशाचे काम सुरू झाले असले तरी ते शास्त्रोक्त पद्धतीने होत नसल्याने नौकानयनासाठी आवश्यक असलेली खोली निर्माण झालेली नाही. परिणामी, जलमार्ग सुरू करण्याचा मूळ उद्देश अद्याप साध्य झालेला दिसत नाही.






