Raigad News: उपोषणाचा चौथा दिवस ठरला यशस्वी; आमदारांच्या मध्यस्थीनंतर अनेक मागण्यांवर तोडगा
नेरळ गावातील नागरी समस्या आणि रस्त्यांवरील अतिक्रमण याविरुद्ध २८ सप्टेंबरपासून सामाजिक कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपोषण सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे, शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते नितीन सावंत यांच्यासह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
गुरूवारी आमदार महेंद्र थोरवे हे उपोषण स्थळी पोहचले आणि त्यांनी गोरख शेप यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सर्व अधिकारी वर्ग बोलावला होता. आमदार महेंद्र थोरवेंनी एक एक करून सर्व विषयांची माहिती घेतली. त्यानंतर नेरळ नगरपरिषद किंवा नगरपंचायत व्हावी यासाठी आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लागावा, असे आश्वासन दिले. (फोटो सौजन्य – AI Created)
ग्रामपंचायतीमधील मागील ५ वर्षे आणि प्रशासक काळातील गैरव्यवहारांची गटविकास अधिकाऱ्यांनी १० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तसेच दोषर्षीवर कार्यवाही करण्याची सूचना आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारींना सूचना करू, असे म्हटले.
आमदार या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्व अधिकारी वर्गाला आदेश दिल्याने उपोषण करताना घेतलेले अनेक विषय मार्गी लागत आहेत, याबद्दल आमदारांचा आभारी आहे. जोवर कल्याण-कर्जत रस्ता अतिक्रमण मुक्त होत नाही तोवर आपले उपोषण सुरूच राहील. – गोरख शेप, सामाजिक कार्यकर्ते
नेरळ गावातील डंपिंग ग्राउंडच्या जमीन कोणी हडप केली? असा आरोप केला जात आहे. तेथील जागा निश्चितीसाठी ग्रामपंचायतीने मोजणीसाठी पैसे भरले असून मोजणी करून जमीन बळकावली असेल तर तत्काळ कारवाई कैली जाईल, असे आश्वासन दिले.
Thane News: पूर्णेकर हत्या महिनाभर आधीच ठरली? मॉक ड्रिल करून आखला कट; दोन शूटर अलिबागजवळून ताब्यात
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मध्ये खऱ्या अर्थाने कचऱ्यावर विघटन व्हावे यासाठी प्रशिक्षण पासून कार्यवाही सुरू केली जाईल असे आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले. नळपाणी योजना ही निधी अभावी रखडली असून त्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक केली जाईल आणि निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच नळपाणी योजना में २०२७ पूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.






