Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ५५ पैकी केवळ ५ जलकुंभ ताब्यात आल्याने कंत्राटदार आणि मजीप्रला ३ जुलैपर्यंत तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 16, 2026 | 03:27 PM
पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज; कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश
Follow Us
Follow Us:
  • पाणीपुरवठा योजनेतील विलंबावरून हायकोर्ट तीव्र नाराज
  • कंत्राटदार आणि ‘मजीप्र’ला एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शहराच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या कार्मामधील विलंब आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्र) व कंत्राटदार यांच्यातील समन्वयाच्या अभावावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. योजनेच्या प्रगतीचा आढावा घेताना मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने संबंधित सर्व पक्षांनी एकत्र बसून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढावा त्याचा अहवाल पुढील आणि सुनावणीवेळी सादर करावा, असे निर्देश दिले.

सुनावणीदरम्यान राज्य शासनाचे मुख्य सरकारी वकील अमरजीतसिंग गिरासे यांनी उच्चस्तरीय समितीच्या बैठकींचा आढावा सादर केला. यामध्ये पूर्ण झालेल्या आणि अपूर्ण असलेल्या कामांचा तपशील देण्यात आला. उर्वरित कामांना अपेक्षित गती मिळत नसल्याची बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ जुलै रोजी होणार असून, त्यावेळी कामांच्या प्रगतीचा आणि मजीप्र, महापालिका तसेच कंत्राटदार यांच्यातील समन्वयाचा अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. एकूण ५९ जलकुंभांपैकी ४ जलकुंभ डी-स्कोप करण्यात आले आहेत.

उर्वरित ५५ जलकुंभ महापालिकेकडे हस्तांतरित करणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ५ स्वतः दिलेल्या जलकुंभच ताब्यात देण्यात आले आहेत. कंत्राटदाराने कालमर्यादांचेही वारंवार उल्लंघन केल्याचा मुद्दा महापालिकेने न्यायालयासमोर मांडला. महापालिकेतर्फे अॅड. संभाजी टोपे यांनी मागील दहा न्यायालयीन आदेशांचा दाखला देत कंत्राटदाराने आदेशांचे पालन केले नसल्याचा मुद्दा उपस्थित केला.

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष; पाच तालुक्यांत पाणीटंचाई, जिल्ह्याच्या सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ

जलकुंभ हस्तांतरणाबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिले असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी काही महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. ही कामे पूर्ण होण्यापूर्वी योजना सुरू केल्यास भविष्यात पुन्हा पाणीपुरवठा बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, असा युक्तिवाद केला.

ही कामे अद्याप बाकीच

जॅकवेलजवळ अॅप्रोच चॅनलचे खोदकाम, जॅकवेल येथे पीईबी बांधकाम, ३७५० अश्वशक्तीचे चार पंप बसविणे, जायकवाडी व फारोळा येथे सर्ज व्हेसल उभारणे, नॉन-रिटर्न व्हॉल्व्ह बसविणे, कॉफर डॅम हटवून परिसराची स्वच्छता करणे तसेच जॅकवेल ते नक्षत्रवाडी दरम्यान पाच स्कॉर वॉल उभारण्याची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. दरम्यान माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. मात्र, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्द्यांचा विचार उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीने करावा, असे निर्देश देण्यात आले.

Ayushman Card: मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त ‘आयुष्मान भारत’ कार्डांची निर्मिती, ५ लाखांचे विमा संरक्षण!

Web Title: High court expresses strong displeasure over the delay in the water supply scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis
  • Water Issue

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
1

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.