Raigad News: रस्ता पूर्ण होण्याआधीच महावितरणचे खोदकाम सुरु; महामार्ग विभागाने दिले काम थांबवण्याचे आदेश
या प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश महामार्ग विभागाने दिले असून, पत्राची प्रत संबंधित राष्ट्रीय महामार्ग व महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रकल्प सल्लागार संस्थेलाही पाठविण्यात आली आहे. त्यामुळे रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याच रस्त्याच्या हद्दीत सुरू झालेले हे खोदकाम आता अधिकृत परवानगीच्या प्रक्रियेत अडकले असून, महामार्ग विभागाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
परवानगी मिळेपर्यंत या कामासाठी कोणतीही यंत्रसामग्री, मजूर अथवा एजन्सी तैनात करू नये, असेही बजावण्यात आले आहे. अनधिकृत कामामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित एजन्सी अथवा महावितरणची राहील आणि झालेले नुकसान त्यांच्या स्वखर्चाने पूर्ववत करावे लागेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
CJP Protest : निवडणूक आयोगाच्या कारभारावरून कॉकरोच जनता पार्टी आक्रमक, मुंबईत आंदोलनाची घोषणा
महाड-रायगड मार्गावर रायगड किल्ल्यावरील विविध कार्यक्रमांच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोडी आणि वाहन पार्किंगची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर तसेच किल्ले रायगडाच्या संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले, राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत करण्यात आलेल्या या कामाला एनएच-१६६ असा क्रमांक देण्यात आला आहे. महाड ते रायगड किल्ला या एकूण २५.६०९ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे पेव्हड शोल्डर्ससह दौन पदरी रस्त्यात पुनर्वसन व श्रेणीसुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये हिरकणीवाडी कनेक्टर ९५० मीटर आणि जिजामाता समाधी कनेक्टर १२१३ मीटरचा समावेश आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणकडून केबल टाकण्यासाठी साईडपट्टीचे यांत्रिक पद्धतीने खोदकाम सुरू करण्यात आले.






