Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

माथेरानमधील ६२ हात रिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा कधी येणार असा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने सर्व हातरिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा दिल्या नसल्याने श्रमिक रिक्षा संघटना आंदोलन करीत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 02:49 PM
Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

Follow Us
Follow Us:
  • माथेरानमधील ९४ हातरिक्षाचालकांपैकी केवळ ३२ जणांना ई-रिक्षा मिळाल्या आहेत.
  • उर्वरित ६२ हातरिक्षाचालक अजूनही हातरिक्षा ओढून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
  • ई-रिक्षा देऊन पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी श्रमिक रिक्षा संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
माथेरान: माथेरान या पर्यटनस्थळी पर्यावरण पूरक ई-रिक्षाच्या माध्यमातून प्रवासी सेवा दिली जाते. हातरिक्षा ओढणाऱ्यांना त्यांच्याकडून होत असलेल्या अमानवी प्रथेतून मुक्त करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व हातरिक्षाचालक यांच्या हाती ई-रिक्षा देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र शासनाने केवळ ३२ हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे उर्वरित ६२ हात रिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा कधी येणार? असा प्रश्न असून हातरिक्षाचालकांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश शासनमान्य करीत नसल्याने हातरिक्षाचालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Raigad News: आश्वासनं नको, ठोस निर्णय हवा! रिलायन्स पाताळगंगा कामगारांचा ७ सप्टेंबरला निर्णायक लढा, आंदोलनाचा इशारा

माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून हातरिक्षाच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक होत होती. त्यानंतर २०१२ मध्ये हातरिक्षाचालकांकडून सुरु असलेल्या अमानवी प्रथेबद्दल सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली गेली आणि २०२२ मध्ये पर्यावरणपूरक प्रदूषण विरहित ई-रिक्षा चालवण्यास परवानगी दिली. माथेरानमध्ये अधिकृत असे ९४ हातरिक्षाचालक असून त्यांच्यापैकी आजच्या तारखेला ३२ हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा शासनाने दिली आहे. त्यातील २० हातरिक्षाचालकांना स्वतः ई-रिक्षा खरेदी करण्याची परवानगी दिली असून माथेरान नगरपरिषदेच्या ६ ई-रिक्षा या १२ हातरिक्षा चालकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच्या घडीला ३२ हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा मिळाली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

अजूनही ६२ हातरिक्षाचालक हे शहरात हातरिक्षा ओढून आपले कुटुंब चालवत असून त्यांच्यासाठी श्रमिक रिक्षा संघटना यांच्याकडून आवाज उठवला जात आहे. माथेरान शहरात असलेल्या सर्व हातरिक्षा बंद कराव्यात आणि हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत.

२५० ई-रिक्षांची आहे गरज

दुसरीकडे माथेरानमध्ये येणारा एकमेव रस्ता हा नेरळ-माथेरान घाटरस्ता असून त्या ठिकाणी २५० टॅक्सेमधून प्रवासी माथेरान शहरात येत असतात. त्यामुळे २५० ई-रिक्षा असाव्यात आणि पर्यटकांना कोणत्याही अडथळा विना माथेरान शहरात येता यावे, पर्यटन करता यावे असा मतप्रवाह देखील पुढे आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र शासनाने सर्व हातरिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा दिल्या नसल्याने श्रमिक रिक्षा संघटना आंदोलन करीत आहे. त्यात केवळ २० हातरिक्षाचालकांना स्वतःची ई-रिक्षा मिळाली असून अन्य १२ हातरिक्षाचालकांना माथेरान पालिकेने रिक्षा दिली आहे. त्यामुळे त्या १२ हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन देखील महत्वाचे असून त्यांना देखील स्वतःची ई-रिक्षा हवी आहे. त्यांना दिलेली ई-रिक्षा शासनाची असल्याने त्यांच्यावर देखील अनेक बंधने आली आहेत.

हातरिक्षाचालकांच्या पुर्नवसनाचे दिले आदेश

माथेरानमधील हातरिक्षाचालकांच्या पूर्वसनाचे आदेश असून देखील त्या ६२ हातरिक्षाचालकांच्या हाती ई-रिक्षा देण्याची कोणतीही तयारी माथेरान नगरपरिषद, माथेरान सनियंत्रण समिती आणि शासनाकडे दिसत नाही. माथेरान नगरपरिषदेने माथेरान शहरात असलेल्या सर्व ९४ हातरिक्षाचालकांना पर्यावरणपूरक ई-रिक्षा मिळाली, असे दराव घेतला आहे. त्याबाबत कोणताही निर्णय सनियंत्रण समिती घेताना दिसत नाही.

Raigad News: कळंबच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! धोकादायक वळणावर वाहनचालकांची कसरत, प्रशासनाकडे केली ‘ही’ मागणी

माथेरान नगरपरिषद काय कार्यवाही करणार ?

माथेरानमध्ये हातरिक्षाचालकांना ई-रिक्षा मिळाल्यानंतर काही ई-रिक्षाचालकांकडून व्यवसाय करताना काही अडथळे येत आहेत. त्यामुळे पर्यटक, नागरिक, विद्यार्थ्यांना वेळेवर सेवा मिळत नाही. काही ई-रिक्षाचालक हे मनमानी करीत असून कोणत्याही वेळी आपली ई-रिक्षा व्यवसाय करण्यासाठी येत असल्याने त्या कामचुकार ई-रिक्षाचालकांमुळे सेवा देण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन माथेरान नगरपरिषद कोणती कार्यवाही करणार? याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागले आहे. माथेरान शहारत रूग्णवाहिका असून देखील ई-रिक्षांचा वापर रुग्णसेवेसाठी होत असल्याचे दिसून आले असून त्याचा फटका प्रवासी वाहतुकीला होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Matheran e rickshaw row 62 hand rickshaw pullers still await rehabilitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Matheran
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
1

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर
2

Chandrapur News: महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! धूळ-कचऱ्यापासून होणार महामार्गाची सुटका, स्वच्छतेसाठी होणार आधुनिक यंत्राचा वापर

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप
3

Raigad News: ५-६ वर्षे आंदोलने, कोट्यवधींचा खर्च… तरीही कालव्याची कामे अपूर्ण; रोह्यातील शेतकऱ्यांचा संताप

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!
4

Sangli Drought Declaration : सांगली जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांचा अखेर दुष्काळाच्या यादीत समावेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.