Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर

खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावरून गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. चिमूर-वरोरा मार्गावरील अतिक्रमित शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दाही चर्चेत आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 30, 2026 | 03:01 PM
Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर

Chandrapur News: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • खडसंगी ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा खर्च व निर्णयांची माहिती तरुणांनी ग्रामसभेत मागितली.
  • चिमूर-वरोरा मार्गावरील शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दा चर्चेत आला.
  • फेरफार झाला असल्यास तो कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
चिमूर: खडसंगी ग्रामपंचायतीच्या कारभारावरून गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. विकासकामे, खर्चाचा तपशील तसेच ग्रामपंचायतीच्या विविध निर्णयांबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच चिमूर-वरोरा मार्गावरील अतिक्रमित शासकीय जागेवरील इमारतीच्या फेरफार नोंदीचा मुद्दाही चर्चेत आला.

Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल

सोमवारी झालेल्या विशेष ग्रामसभेत तरुणानी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची माहिती आणि खर्चाचा तपशील मागितला. मात्र, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित नसल्याने समाधानकारक माहिती मिळू शकली नसल्याचा दावा तरुणांनी केला. त्यामुळे फेर विशेष ग्रामसभा घेण्याची मागणी करण्यात आली असून, त्याबाबत ठराव झाल्याचे सांगण्यात येते. यादरम्यान, चिमूर-वरोरा मार्गावरील शासकीय जागेवर असलेल्या एका इमारतीच्या फेरफार नोंदीचा विषयही ऐरणीवर आला आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

संबंधित जागा महसूल विभागाच्या अखत्यारित असून, आपल्या कार्यकाळात फेरफार केला नसल्याचे तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आकाश कवाडे यांनी स्पष्ट केले. मात्र, त्यांच्या कार्यकाळानंतर या प्रकरणात नेमकी कोणती कार्यवाही झाली. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा विषय मासिक सभेत मांडण्यात आला होता. फेरफार करू नये आणि झालेला असल्यास रद्द करावा, असा ठराव झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे फेरफार झाला असल्यास तो कोणत्या प्रक्रियेतून आणि कोणत्या कागदपत्रांच्या आधारे झाला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

विशेष ग्रामसभेकडे आता नागरिकांचे लक्ष

फेरफाराच्या मुद्द्यासह ग्रामपंचायतीच्या कारभारातील विविध प्रश्नांवर तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली. आगामी विशेष ग्रामसभेत या प्रकरणावर जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही ग्रामसभा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. फेरफार नेमका कसा झाला, त्यासाठी कोणती कागदपत्रे वापरण्यात आली आणि संबंधितांची भूमिका काय होती, याचा उलगडा अधिकृत कागदपत्रे व चौकशीतूनच होणार आहे.

मी ग्रामपंचायत अधिकारी असताना हे प्रकरण मासिक सभेत आले होते. सदर जागा महसूल विभागाची असून शासकीय जागेत येत असल्याने माझ्या कार्यकाळात फेरफार केलेला नाही. माझ्यानंतर आलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याऱ्यांनी काय केले, याची माहिती नाही. – आकाश कवाडे, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी, चिमूर

Dombivli News: संस्कारांचा वारसा जतनासाठी डोंबिवलीत उपकर्म उत्सव; २०० ब्राह्मण कुटुंबांचा सहभाग

मासिक सभेत संबंधित विषय आलेला होता, मात्र तो रद्द करण्यात आला होता, अशी माहिती दिली. दरम्यान, फेरफार झालेला असल्यास संबंधित मासिक सभेत कोणकोणते पदाधिकारी उपस्थित होते, याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी आल्यानंतरच स्पष्ट होईल, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.- संदीप भोरकर, उपसरपंच, चिमूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Khadsangi gram panchayat ferfar entry issue chimur special gram sabha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
2

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
3

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.