Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड; ब्रिटिश काळातील वाफेच्या इंजिनाचाच नवा फंडा

माथेरान हेरिटेज मिनी ट्रेनला लवकरच हायड्रोजन इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी हे तंत्रज्ञान ब्रिटिशकालीन वाफेच्या इंजिनाच्या संकल्पनेशी साधर्म्य असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 12:09 PM
माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड; ब्रिटिश काळातील वाफेच्या इंजिनाचाच नवा फंडा

माथेरान मिनी ट्रेनला हायड्रोजन इंजिनची जोड; ब्रिटिश काळातील वाफेच्या इंजिनाचाच नवा फंडा

Follow Us
Follow Us:
  • हायड्रोजन रेल्वे हा ब्रिटिश काळातील जुनाच प्रयोग…
  • मिनीट्रेन चालवताना सुरू असलेली हरित ऊर्जेची साथ रेल्वेने बंद केली?
  • आता जुनाच फंडा हायड्रोजन इंजिनचे नावाने बाजारात…
ब्रिटीशकालीन वारसा लाभलेली आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र असलेली नेरळ माथेरान हेरिटेज मिनीट्रेन आता नव्या तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने राबविलेल्या ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ या महत्त्वाकांक्षी योजनेत माथेरान हिल रेल्वेचा विचार आहे.पण ब्रिटिश काळात नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन वाफेच्या इंजिनवरच चालायची.त्यामुळे रेल्वेने हायड्रोजन रेल्वे हा प्रयोग राबवल्यावर मोठा गाजावाजा केला आहे.परंतु मिनी ट्रेन चालवण्यात यशस्वी ठरलेला जुना फंडा हायड्रोजन रेल्वे म्हणून बाजारात आणला आहे.

Navarashtra Impact : चिवेली ग्रामीण पेयजल योजना वादात; तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयाची सुनावणी, अनेक अधिकारी राहणार हजर

ब्रिटीश काळात 1907 मध्ये मध्य रेल्वे वरील नेरळ येथून माथेरान साठी मिनी ट्रेन सुरू झाली.1984 पर्यंत रेग्युलर मिनी ट्रेन ही वाफेपासून तयार होणाऱ्या ऊर्जेवर चालायची.नंतर जर्मन बनावटीची वाफेवरील इंजिने एक एक करून हेरिटेज म्हणून रेल्वेने आपल्या म्युझियम मध्ये ठेवून घेतली. त्यातील एक इंजिन नवी दिल्ली येथील रेल भवन बाहेर तर एक इंजिन मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तर एक इंजिन नेरळ जंक्शन येथे आणि एक इंजिन माथेरान रेल्वे स्थानकात शोभेचे बाहुले बनून उभी आहेत.1853 मध्ये भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळी देखील वाफेवर चालणाऱ्या इंजिनवरच चालवली जात होती.

ही रेल्वे माथेरान मार्गावर चालवताना इंजिन मधून पडणारे आगीचे लोळ यामुळे नेरळ माथेरान दरम्यान चे प्रवासात आग लागून जंगल नष्ट होत होते.आता प्रधानमंत्री यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरू झालेल्या हायड्रोजन रेल्वे चे इंजिनात निर्माण होणारी ऊर्जा ही कोळशापासून तयार होणार आहे.आणि गाडी पुढे जात असताना इंजिन मधून पाणी बाहेर पडणार आहे. ब्रिटिश काळात देखील वाफेवरील इंजिन अशाच प्रकारे कोळशावर चालवली जात होती. त्यामुळे हायड्रोजन इंजिन मध्ये नेमके वेगळे काय? असा प्रश्न पडतो.

मिनी ट्रेन डिझेलवर..

सध्या नेरळ ते माथेरान दरम्यानची मिनिट्रेन इंजिन हे डिझेल या इंधनाचा वापर होतो.भविण्यात हायड्रोजन इंजिनाचा वापर सुरू झाल्यास धूर, कार्बन उत्सर्जन आणि ध्वनीप्रदूषणात मोठी घट होईल. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होण्याबरोबरच पर्यटकांना अधिक स्वच्छ, शांत आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

अर्थसंकल्पात घोषणा..

भारतीय रेल्वेने २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘हायड्रोजन फॉर हेरिटेज’ योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत ऐतिहासिक रेल्वेमार्गावर हायड्रोजर्नवर चालणारी इंजिने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच योजनेत माथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आल्याने या प्रकल्पाला विशेष महत्व प्रापत झाले आहे. दरम्यान, देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेच्या शुभारंभानंतर हेरिटेज रेल्वेमार्गावरही हे तंत्रज्ञान वापरण्याच्या हालचाली यांना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर माथेरान मिनिट्रेन देखील हायड्रोजन इंजिनाची जोड मिळणार असल्याने प्रवासी वर्गात आनंद आहे.

Ratnagiri News: रत्नागिरीचा कायापालट ठरला! ७ कोटींचे भव्य शॉपिंग सेंटर, पायाभूत सुविधांसाठी भरघोस निधी

हेरिटेज नामावलीमध्ये कधी?

सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत नागमोडी वळणे घेत धावणारी ही मिनिट्रेन देशातील ऐतिहासिक हेरिटेज रेल्वेमागींपैकी एक मानली जाते.दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक या रेल्वेच्या प्रवासाचा आनंद घेत असतात. आता आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने या रेल्वेचे आकर्षण आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Matheran mini train hydrogen engine heritage railway green energy project marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 12:09 PM

Topics:  

  • hydrogen Train
  • Matheran
  • NAVARASHTRA
  • Raigad News

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा
2

MUMBAI News: मनसेच्या ‘मराठी मानाची दहीहंडी’चा जल्लोष, दिवंगत मराठी नेते अन् कलाकारांच्या आठवणींना उजाळा

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?
3

Chandrapur News: विद्यार्थी शाळेत पोहोचले, पण शिक्षकच गायब! गोंडपिपरीत पालकांचा गोंधळ; नेमकं काय घडलं?

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
4

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.