
Raigad News: घंटागाड्या फिरतात, तरीही रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग; महाडमध्ये दुर्गंधीने नागरिक हैराण
महाड नगरपरिषदेमार्फत शहरातील गल्लीबोळांत घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो. यासाठी पाच घंटागाड्या, एक ट्रॅक्टर आणि एक डंपर तैनात करण्यात आला आहे. सकाळपासून कचरा संकलन सुरू असते, तर दोन घंटागाड्या दुपारच्या सुमारासही शहरात फिरवल्या जातात. याव्यतिरिक्त, कचरा गोळा करण्यासाठी नगर परिषदेचा डंपर सकाळी ९:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत कार्यरत असतो. एवढी यंत्रणा उपलब्ध असतानाही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असल्याने या समस्येचे मूळ नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनात असल्याचे स्पष्ट होते. (फोटो सौजन्य – AI Created)
शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असली, तरी सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. प्रशासनाने स्वच्छतेची यंत्रणा उभी करायची आणि नागरिकांनी त्याच परिसरात कचरा टाकून अस्वच्छता निर्माण करायची, हा विरोधाभास थांबण्याची गरज आहे. अखेर फलक लावूनही कचरा टाकण्याची वृत्ती बदलत नसेल, तर महाडकरांची स्वच्छतेबाबतची बेजबाबदार मानसिकता बदलणार तरी कधी? हा सवाल आजही अनुत्तरितच राहिला आहे.
काही नागरिकांच्या तक्रारीनुसार घंटागाडी रोज वेळच्यावेळी उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आले आहे, कधी कधी दोन-दोन दिवस घंटागाडी न आल्याने नाईलाजास्तव नागरिकांना कचरा उघड्यावर टाकावा लागत असल्याचे सांगण्यात येत. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने अधिक माहिती घेऊन घंटागाडीच्या नियोजनात आवश्यक ती भूमिका घ्यावी अशी मागणी देखील केली जात आहे.
कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा
महाड-रायगड मार्गावर नाल्याशेजारी मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. गंधारी नाका ते दस्तुरी नाका या मार्गावरही रस्त्याच्या कडेला कचरा साचल्याने दुर्गंधी पसरत आहे. गंधारी नाका ते दस्तुरी नाका मार्गावरील एका ठिकाणी सातत्याने कचरा टाकला जात असल्याने तेथे कचऱ्याचा मोठा ढीग तयार झाला होता. परिसरातील विद्यमान नगरसेवक वजीरभाई कॉडीवकर यांच्या पुढाकाराने ह्य परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांना समजावून सांगूनही त्याच ठिकाणी पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरू राहिले.