Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: जमीन दिली पण पैसे नाहीत! मुरुड-जंजिरा पुलाचे काम ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने आंदोलन

मुरुड जंजिरा परिसरातील कोस्टल हायवे प्रकल्पातील महत्त्वाचा पूल सध्या वादात अडकला आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न मिळाल्याने त्यांनी काम बंद पाडल्यामुळे सुमारे 1200 कोटींचा हा प्रकल्प थांबला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 04, 2026 | 03:00 PM
Raigad News: जमीन दिली पण पैसे नाहीत! मुरुड-जंजिरा पुलाचे काम ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने आंदोलन

Raigad News: जमीन दिली पण पैसे नाहीत! मुरुड-जंजिरा पुलाचे काम ठप्प; शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांनी पुलाचे काम बंद केले.
  • 1200 कोटींचा प्रकल्प सध्या ठप्प आहे.
  • मे महिन्यात पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले.
मुरुड जंजिरा: कोस्टल हायवे अंतर्गत रायगड जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यास जोडण्यासाठी सुमारे १२०० कोटी रुपये खर्च करून सुमारे ४ किलोमीटर अंतराचे पुलाचे बांधकाम मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले होते. मुरुड तालुक्यातील टोकेखारभागातून हा पूल म्हसळा तालुक्यातील बुरंबाडी गावाला जोडण्यात येणार आहे. या पुलाचे काम एचएससी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने सुरुवातीच्या काळात खूप जोरदार काम सुरू केले. पुलाचे काही अंशी काम सुद्धा पूर्ण झाले आहे. शेकडोच्या संख्येने कामगार जोरदार काम करीत होते. परंतु सध्या टोकेखार भागातील काम संपूर्णतः बंद करण्यात आले आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी, पण सुविधा अपुऱ्या! नागाव समुद्र किनाऱ्यावर अंधार, स्वच्छता आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर

शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळाला नाही

या पुलाच्या बांधकामासाठी शेतकरी वर्गास त्यांनी जमिनी देऊन सुद्धा मोबदला दिला गेला नाही, हे मुख्य कारण आहे. मुरुड तालुक्यामधील सावली व टोकेखार भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी या पुलासाठी गेलेल्या आहेत. सुरुवातीला चांगाला मोबदला मिळेल म्हणून अमिष दाखवण्यात आले होते. परंतु पुलाचे बांधकाम होऊन सुद्धा अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाच्या जमिनीचे पैसे मात्र प्राप्त न झाल्याने अखेर येथील स्थानिक शेतकरी एकवटले व या भागात सुरू असलेले काम अखेर बंद करण्यात आले आहे.

पुलाच्या कामासाठी येथील स्थानिक शेतकरी वर्गाने आपल्या जमिनी दिल्या आहेत. जमिनी दिल्यावर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने शेतकरी वर्गाला पैसे देणे अनिवार्य होते. आज येतील, उद्या पैसे देतील अशी अनेक दिवस प्रतीक्षा करून सुद्धा शेतकरी वर्गास पैसे प्राप्त न झाल्याने अखेर सर्वांनी काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला. – शाम कोतवाल, स्थानिक शेतकरी

शेतकऱ्यांकडून नाराजी

पुलाचे काम बंद होऊन अनेक दिवस जाऊन सुद्धा शेतकरी वर्गास जमिनीचे पैसे प्राप्त झालेले नाहीत. वाबाचत येथील स्थानिक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करून जोपर्यंत जमिनीचे पैसे प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही येथील काम करू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे येथील भागातील पुलाचे हे काम गेले अनेक दिवस बंद आहे.

सिन्नर MIDC मध्ये प्लॉट दरांचा भडका; चारपट किंमतीनी विक्री, ‘औद्योगिक विकास की रिअल इस्टेट खेळ?’ उद्योजकांचा सवाल

मे मध्ये शेतकऱ्यांना मोबदला मिळणार !

याबाबत दै. ‘नवराष्ट्र’ च्या प्रतिनिधीने रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी संजय गोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “सावली व टोकेखार येथील शेतकरी वर्गाची मीटिंग घेण्यात येऊन त्यांच्या समस्या ऐकण्यात येऊन त्यावर योग्य तोडगा सुद्धा काढण्यात आला आहे. मे महिन्यात सर्व शेतकरी वर्गाला त्यांच्या जमिनीचे पैसे त्यांना देण्यात येणार आहेत. पुलाचे काम काही दिवस बंद होते.” आता शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावर हे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Murud janjira bridge project stalled as farmers halt work over compensation delay raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Murud-Janjira
  • NAVARASHTRA
  • raigad

संबंधित बातम्या

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
1

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
2

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
3

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू
4

अरुणाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; फ्लॅश फ्लडमध्ये ५ जवान बेपत्ता, भूस्खलनात चौघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.