Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Neral Gram Panchayat : नेरळ ग्रामपंचायतीचा शब्द पाळला; 1,200 मीटर जलवाहिनी टाकत आदिवासी वस्तीची तहान भागवली

नेरळ ग्रामपंचायतीअंतर्गत कोंबलवाडीतील ढाकीचा माळ या आदिवासी वस्तीला ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच नळाचे पाणी मिळाले आहे. 17 जून रोजी ग्रामसभेत आदिवासी ग्रामस्थांनी मोर्चा काढून पाणीपुरवठ्याची मागणी केली होती.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 20, 2026 | 12:12 PM
नेरळ ग्रामपंचायतीचा शब्द पाळला; 1,200 मीटर जलवाहिनी टाकत आदिवासी वस्तीची तहान भागवली

नेरळ ग्रामपंचायतीचा शब्द पाळला; 1,200 मीटर जलवाहिनी टाकत आदिवासी वस्तीची तहान भागवली

Follow Us
Follow Us:
  • नेरळ ग्रामपंचायतीने शब्द पाळला
  • कोमल वाडी विहिरी ते ढाकीचा माळ येथे नवीन जलवाहिनी टाकून दिले पाणी
  • 1,200 मीटर जलवाहिनी टाकत आदिवासी वस्तीची तहान भागवली
कर्जत : नेरळ ग्रामपंचायत मधील कोंबलवाडी मधील ढाकीचा माळ येथे असलेली आदिवासी ग्रामस्थांना नेरळ ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून एकदाही नळाचे पाणी पोहचले नव्हते.या आदिवासी ग्रामस्थांनी 17 जून रोजी नेरळ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत मोर्चा आणला होता.त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी आठ दिवसांत जलवाहिनी टाकून पाणी पोहचवले जाईल असे आश्वासन ग्रामसभेत दिले होते.दरम्यान त्या आश्वासनानंतर तिसऱ्याच दिवशी नेरळ ग्रामपंचायतीने आपला शब्द पाळला आणि ढाकीचा माळ येथे 1200 मीटर जलवाहिनी टाकून पाणी पोहचले,त्यावेळी ग्रामस्थांनी मोठा जल्लोष केला.

Matheran News : रेल्वे स्थानकात बेकायदा जाहिरातींचा विळखा; संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

ढाकीचा माळ हा भाग नेरळ ग्रामपंचायत मधील असून त्या ठिकाणी नळाचे पाणी अद्याप पोहचले नव्हते.येथील आदिवासी लोक माथेरान डोंगरातून वाहणाऱ्या नाल्यामध्ये डवरे खोदून पाणी घरी आणत होते.तर एप्रिल मे महिन्यात हे आदिवासी लोक त्या भागातील फार्महाऊस मध्ये जाऊन पिण्याचे पाणी आणण्याचं काम करीत होते.ग्रामपंचायत पाणी देत नसल्याने 17 जून बुधवार रोजी नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसभेत मोर्चा घेऊन पोहचले.त्यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आम्हाला नळाचे पाणी मिळणार आहे की नाही? असा प्रश्न केला.त्यावर ग्रामसभेला उपस्थित जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी त्या रहिवाशी यांना आठ दिवसांत दोन इंच व्यासाची जलवाहिनी टाकून पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर ग्रामपंचायत स्तरावरून हालचाली करण्यात आल्या आणि नेरळ ग्रामपंचायतीच्या स्थापने पासून कधीही नळाचे पाणी पोहचले नव्हते त्या ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले.

तीन दिवसात नेरळ ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाने कोंबलवाडी ते ढाकीचा माळ अशी 1200 मीटर लांबीची जलवाहिनी टाकून घेतली.या जलवाहिनीला सार्वजनिक स्टँड पोस्ट तयार करून घेण्यात आले.त्यानंतर आज सकाळी ढाकीचा माळ येथे नळाचे पाणी पोहचले.ही आदिवासी वाडी निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा ढाकीचा माळ येथे नळाचे पाणी पोहचले असल्याने येथील रहिवाशी यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंचे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून नळाचे कॉक सुरू करून पाणी पुरवठा सुरू केला.त्यावेळी ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर,ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले,शिवसेना नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर,युवासेना तालुका प्रमुख प्रथमेश मोरे,ग्रामपंचायत माजी सदस्य नितीन निरगुडा तसेच अनेक कार्यकर्ते आणि स्थानिक आदिवासी उपस्थित होते.

Karjat News : नेरळमध्ये पावसाळ्यापूर्वी भीतीचे वातावरण! बिल्डरच्या माती भरावामुळे नैसर्गिक नाला बंद

Web Title: Neral dhakicha mal tribal village gets tap water for first time after 1200 meter pipeline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • gram panchayat
  • neral
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
1

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह
2

Raigad : कोट्यवधींचा खर्च तरीही पाणीटंचाई कायम; नागलोली तलाव प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी
3

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका
4

Raigad News: जनतेचा विरोध असेल तर बल्क ड्रग पार्क नकोच; सुनील तटकरेंची स्पष्ट भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.