Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश

कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायतीत प्रशासक काळात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कोणतीही अधिकृत नोंद नसताना 43 अनधिकृत नळजोडण्या देण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 13, 2026 | 11:41 AM
Raigad News: नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश

Raigad News: नेरळ ग्रामपंचायतीत मोठा घोटाळा उघड! 43 अनधिकृत नळजोडण्या समोर, कारवाईचे आदेश

Follow Us
Follow Us:
  • नेरळ ग्रामपंचायतीत 43 अनधिकृत नळजोडण्या आढळल्या; यापूर्वी 15 जोडण्या तोडल्या होत्या
  • नोंद, परवानगी आणि पावती नसताना बिल्डर लॉबीला पाणी जोडण्या दिल्याचा आरोप
  • प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना, आर्थिक व्यवहारांबाबतही संशय
कर्जत: कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक काळात अनेक घोटाळे बाहेर येत आहेत. त्यात अनधिकृतपणे नळजोडण्या देण्याचा प्रकार उघडकीस आला असून आता आणखी ४३ नळजोडण्यांचा घोटाळा समोर आला आहे. यापूर्वी १५ नळजोडण्यांची नोंद ग्रामपंचायतीकडे नसल्याने त्या नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली होती.

Chandrapur News: ‘लाडकी बहीण’ योजनेत गोंधळ! 2100 रुपयांचे आश्वासन हवेतच, 50 हजार महिला अपात्र

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये शुद्ध पाणी मिळत असल्याने आणि हे ठिकाण रेल्वेने जोडले असल्याने बाहेरून येथे राहण्यासाठी आलेल्यांची संख्या दररोज वाढत आहे. मागील दोन वर्षे नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेले प्रशासक राजवटमध्ये कारभाराचा सावळा गोंधळ दिसून येत आहे. बिल्डर लॉबीला नळजोडणी देताना त्यांची कोणतीही नोंद नाही आणि देणगी पावती नाही. तसेच नळजोडणी करण्याचे आदेश देखील नाहीत. पण नळजोडणीद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी नव्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या हा प्रकार लक्षात आला. बिल्डर लॉबीच्या अनेक जोडण्या काढून टाकण्यात आल्या असून त्यांची कोणतीही नोंद नेरळ ग्रामपंचायतकडे मिळाली नाही.

गुन्हा दाखल करून कारवाईच्या सूचना

पाणी पुरवठा विभाग यांना जिल्हा परिषद सदस्य सुनीता मोरे आणि पंचायत समिती सदस्य भगवान चंदे यांनी विश्वासात घेऊन ग्रामपंचायत दफ्तरी नोंद नसलेल्या नळजोडण्यांची यादी मागवून घेतली आहे. नेरळ ग्रामपंचायतीमधील विविध भागात आता कोणतीही नोंद नसलेल्या आणि पूर्णपणे अनधिकृत असलेल्या ४३ नळजोडण्या आढळून आल्या आहेत. त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही ग्रामपंचायतने करावी अशी सूचना पंचायत समितीचे सदस्य आणि माजी सरपंच भगवान चंचे यांनी ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांना केली आहे. आता त्या नळजोडणी पुन्हा कायम करायच्या असल्यास मोठा निधी देणगी मधून नेरळ ग्रामपंचायतकडे प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे कामगार वर्ग देखील पाहणी करू लागला आहे.

अनधिकृत नळजोडणी देताना आर्थिक व्यवहार

ही बाब लक्षात घेऊन सर्च मोहीम हाती घेतल्यानंतर सध्याच्या प्रशासक काळात नेरळ ग्रामपंचायत हद्दीत अनेक नळजोडण्या दिल्याचे उघडकीस आले आहे. या नळजोडणी देताना आर्थिक व्यवहार केल्याचे नळजोडणी मालक सांगत आहेत, मात्र त्यांची कोणतीही नोंद नेरळ ग्रामपंचायतीकडे नसल्याने त्या-त्या जोडण्या कापून टाकण्यात येत आहेत.

Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास होणार सुरक्षित! देशातील पहिली ‘नॉन-एसी’ बंद दरवाज्यांची लोकल दाखल; कधीपासून सुरू होणार प्रवास?

नेरळ एसटी स्टँड परिसरातील एका इमारतीत दोन नळजोडण्या आढळून आल्या पण त्यांची कोणतीही नोंद आढळून आली नाही आणि ज्यावेळी या नळजोडण्या तोडण्यात येत होत्या. त्यावेळी लाखो रूपये दिल्याचे रहिवासियांनी सांगितले आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे त्या नळजोडणींची नोंद नाही आणि नळजोडणी करण्याची परवानगी देखील नसल्याने त्या जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचार्‍यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Neral gram panchayat water scam 43 illegal connections exposed action ordered raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Karjat
  • neral
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष
1

Raigad News: ‘मुक्तांगण’च्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी; गोविंदा गीतांवर धरला ठेका, प्रांगणात रंगला जल्लोष

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस
2

Raigad News: महाडमध्ये दहीहंडीचा थरार! १ लाख ५१ हजारांच्या बक्षिसासाठी गोविंदा पथकांमध्ये रंगणार जोरदार चुरस

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त
3

Sudhakar Ghare Arrest: महाएल्गार आंदोलनापूर्वी सुधाकर घारे यांना अटक; खालापूरमधून अलिबागला नेल्याने कार्यकर्ते संतप्त

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण
4

Raigad News: रायगडच्या मतदार यादीत मोठी तफावत; ५ लाख ८४ हजार गणना प्रपत्रांचे संकलनच अपूर्ण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.