फोटो सौजन्य सोशल मिडिया
Sindhudurg To Buy Fish : गणपती विसर्जनानंतर सिंधुदुर्गात मासे खरेदीसाठी मोठी गर्दी ….
पोलादपूर बस स्थानकात नवीन इमारत उभारण्यात आली; त्या सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने बस स्थानक परिसरातील परिस्थिती आणि बस स्थानकातील स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. विशेषतः प्रवाशांची मोठी वर्दळ पोलादपूर बस स्थानकात होत असते; या ठिकाणी सांडपाणी उघड्यावर जाणे हे प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही चिंतेचे बाब ठरत आहे.
पोलादपूर बस स्थानकात नवीन इमारत उभारण्यात आली असून प्रवासी आणि स्थानिक नागरिक मूलभूत सुविधा मिळत नसल्याने, तसेच देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडुन तक्रार व्यक्त केली जात आहे. त्यातच नवीन इमारतीतील वैद्यकीय कक्ष आणि उपहारगृह अद्याप प्रवाशांच्या सेवेसाठी बंद असल्याने उपलब्ध सुविधेचा पूर्ण लाभ प्रवाशांना मिळत नाही आहे….
‘इमारत नवी मात्र समस्या जुनी’ अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त होत असून मुतारीच्या सांडपाण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करून परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याची मागणी प्रवासी करत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन प्रवाशांना दुर्गंधी व अस्वच्छतेपासून दिलासा द्यावा अशी मागणी आणि अपेक्षा प्रवासी करत आहे.
रायगड जिल्ह्यातील शेवटचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोलाद पूर बस स्थानकाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले.पण या इमारतीच्या सांडपाण्याची उपाय योजना करता येईल का असा प्रश्न आता प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत आहे.






