Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad: जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस; वेळेत उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू

रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून खवसावाडी साठी 60 लाख रुपये निधी मिळूनही रस्त्याचे काम झाले नसल्याचे उघड झाले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 20, 2025 | 05:26 PM
Raigad: जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस; वेळेत उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू

Raigad: जिल्हाधिकाऱ्यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस; वेळेत उपचार न मिळाल्याने आदिवासी महिलेचा मृत्यू

Follow Us
Close
Follow Us:

पेण (विजय मोकल) : पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांतील आदिवासी बांधव रस्त्याच्या शोधात आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून खवसावाडी साठी 60 लाख रुपये निधी मिळूनही रस्त्याचे काम झाले नसल्याचे उघड झाले आहे. तसेच उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जानेवारी 2024 मध्ये 7.22 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्याचे काम न झाल्याने रस्ता गेला कुठे असा प्रश्न आदिवासी बांधव करीत आहेत.

याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आदिवासींच्या मूलभूत हक्कांचे उघडपणे उल्लंघन होत असताना प्रशासन केवळ डोळेझाक करत आहे. ही निष्क्रियता असह्य असून, या गंभीर प्रश्नाकडे लोकांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

पाणीकर वसुलीबाबत ठाणे मनपा अ‍ॅक्शनमोडवर; माजिवडा-मानपाडा परिसात राबविली कर वसूल मोहिम

खवसावाडीतील आंबि राघ्या कडू या महिलेचा रस्ता नसल्याने वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. हा प्रकार मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन असून, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा बळी गेला असल्याचा आरोप संतोष ठाकूर यांनी केला आहे. या प्रकरणी संतोष ठाकूर, अ‍ॅड. सिद्धार्थ इंगळे यांच्या माध्यमातून राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली. आयोगाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावून चार आठवड्यांत तथ्य शोध अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आजपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीकरांच्या वाट्याला काय? मनपाच्या अर्थसंकल्पात 3 हजार 361 कोटींची तरतूद

उंबरमाळ, केळीचीवाडी, तांबडी, खवसावाडी आणि काजूवाडी या वाड्यांसाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत जानेवारी 2024 मध्ये 7.22 कोटींचा ठेका सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन यांनी घेतला. मात्र, वर्क ऑर्डरची मुदत संपूनही अद्याप काम सुरू झालेले नाही.या अन्यायाविरोधात नागरिकांनी पुढे येऊन आवाज उठवावा, जेणेकरून आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळू शकेल. असे संतोष ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले.

या पत्रकार परिषदेला संतोष ठाकूर सामाजिक कार्यकर्ते, ग्राम संवर्धन सामाजिक संस्था, ऍड. एडवोकेट सिद्धार्थ इंगळे, ऍड. विकास शिंदे, नंदकुमार पवार, पाच वाड्यातील ग्रामस्थ प्रतिनिधी यशवंत खाकर, सुनील वाघमारे, काल्या कडू, गीता वाघमारे, पल्लवी खाकर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे राजेश रसाळ, सचिन पाटील यांच्यासह आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते.

Web Title: Raigad human rights commission notice to district collector tribal woman dies due to lack of timely treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • pen news
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
1

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप
2

Raigad News: खोपोली हत्याकांडानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू; आ. महेंद्र थोरवेंवर केले गंभीर आरोप

Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ
3

Raigad News: रायगडमधील पर्यटनस्थळे हाऊसफुल्ल, पर्यटकांना समुद्र किनाऱ्यांची भुरळ

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत
4

Raigad Crime: खोपोलीतील मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला ‘बीड कनेक्शन’! आमदार महेंद्र थोरवेंचा खळबळजनक आरोप; 9 आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.