Raigad News: रायगड लोकसभेवर शिंदे गटाचा दावा? भरत गोगावलेंच्या ‘झाकली मूठ’ वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण
Raigad News: माथेरानमध्ये ३२ जणांना ई-रिक्षा, मग उर्वरित ६२ जणांचं काय? शहरात पुन्हा आंदोलनाची चाहूल
अलिबाग येथे दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने संवाद साधताना गोगावले यांनी रायगडच्या आगामी खासदारकीबाबत भूमिका मांडली. “जे काही निर्णय घ्यायचे आहेत, ते आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. आम्ही तिन्ही आमदार त्या निर्णयावर ठाम राहू. पुढील निवडणुकीला अजून पावणेतीन वर्षे बाकी आहेत. थोडा संयम ठेवावा लागेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, त्याचवेळी “ऐऱ्यागैऱ्याला उमेदवारी देण्यापेक्षा शिवसेनेचा एखादा निष्ठावान साधा कार्यकर्ता उभा केला, तरी तो सहज निवडून येईल,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे रायगडची आगामी लोकसभा जागा शिंदे गट लढविण्याच्या तयारीत असल्याचा अर्थ काढला जातोय. (फोटो सौजन्य: Instagram)
दहीहंडी आणि गोविंदा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोगावलेंनी उद्धव ठाकरे गटावरही जोरदार टीका केली. कोरोना काळात तत्कालीन सरकारने गोविंदा आणि दहीहंडी उत्सवावर निर्बंध घातल्याचा उल्लेख करत त्यांनी, “उत्सवांवर बंदी घालणारे आता घरी बसले आहेत आणि ती बंदी उठवणारे आम्ही आता राज्याच्या सत्तेत आहोत,” असा टोला लगावला. गोविंदा, बैलगाडा शर्यत, कबड्डी आणि कुस्ती यांसारख्या पारंपरिक खेळांना सरकारचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

गोगावले यांच्या “शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता उभा केला तरी सहज निवडून येईल” या वक्तव्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या जागावाटपावरून नव्या चर्चाना सुरुवात झाली असून, आगामी काळात या राजकीय घडामोडींना कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.